कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा पक्षविस्ताराचा धडाका सुरुच आहे. ममता बॅनर्जी यांनी बुधवारी रात्री काँग्रेसवर पॉलिटिकल स्ट्राईक केला आहे. मेघालयातील काँग्रेसच्या 18 पैकी 12 आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यामळं मेघालयात निवडणूक न लढवता ममता बॅनर्जींच्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे.
मेघालय विधानसभेतील काँग्रेस पक्षाच्या 12 आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेसचे इथं 18 आमदार होते त्यापैकी 12 आमदार ममता यांच्या पक्षात गेले आहेत. माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत.
मेघालयमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला मोठा झटका दिलाय. विधानसभेची निवडणूक न लढता मेघालय मध्ये तृणमूल काँग्रेस बनला विरोधी पक्ष बनला आहे. आज दुपारी तृणमूल प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.
मेघालयमधील विधानसभेची एकूण सदस्य संख्या 60 आहे. इथं भाजपच्या समर्थनातील एनडीएटे 40 आमदार आहेत. तर, काँग्रेसचे 18 आमदार होते. त्यापैकी 12 आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. दोन तृतियांश आमदारांनी पक्षांतर केल्यानं काँग्रेसला बंडखोरी करत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांवर पक्षातंर बंदी कायद्याअतंर्गत कारवाई करता येणार नाही. यामुळं मेघालयात आता काँग्रेसच्या जागी तृणमूल काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करेल.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपनं मोठी ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्र्यांनी ममता बॅनर्जी यांची सत्ता घालवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, पश्चिम बंगालच्या होम ग्राऊंडवर एक हाती सत्ता आणल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पक्षविस्ताराचा कार्यक्रम सुरु केला आहे. गोव्यातील काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फलेरो यांना पक्षात घेत राज्यसभेवर खासदार म्हणून संधी दिली आहे. उत्तर प्रदेशातील काही काँग्रेस नेते देखील तृणमूलमध्ये प्रवेश करणार आहेत. मेघालयच्या निमित्तानं तृणमूल काँग्रेसनं पश्चिम बंगालच्या बाहेर पक्ष विस्ताराचं धोरण ठेवल्याचं दिसून येत आहे.
इतर बातम्या:
वरुण गांधी टीएमसीमध्ये जाणार?; पुढच्या आठवड्यात ममता बॅनर्जींची भेट घेण्याची शक्यता
Meghalaya 12 congress mla joins Mamata Banerjee party Trinamool Congress now TMC became major opposition in state