जयपूर : राजस्थानच्या हनुमानगड येथे मिग 21 हे विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेत चार ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे. तर एकजण जखमी झाला आहे. हनुमानगड येथील बहलोल नगर गावात ही दुर्घटना घडली. विमान कोसळत असताना पायलटने विमानातून उडी घेतली. त्यामुळे तो बचावला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली आहे.
आज सकाळी ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे. हे हवाई दलाचं विमान सूरतगडला जात होतं. विमानात बसल्याने अपघात होणार असल्याचं पायलटच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने तात्काळ पॅराशूट घालून विमानातून उडी मारली. त्यामुळे विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित बचावले. त्यांना काही झालं नाही. मात्र, नंतर विमान हनुमागड येथे कोसळलं.
हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातात विमानाचा चक्काचूर झाला आहे. तसेच या अपघातात चार ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. विमानाच्या ढिगाऱ्यातून आग आणि धूर निघत होता. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. विमान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू केलं. विमान पाहण्यासाठी या परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जमावाला पांगवण्याचं काम सुरू आहे.
भारतीय वायुसेना का मिग-21 लड़ाकू विमान आज सुबह राजस्थान के हनुमानगढ़ के पास दुर्घटनाग्रस्त हो गया। विमान ने सूरतगढ़ से उड़ान भरी थी। पायलट सुरक्षित है। अधिक जानकारी की प्रतीक्षा है: IAF स्रोत pic.twitter.com/DuCkgnbekn
— ANI_HindiNews (@AHindinews) May 8, 2023
विमानाचा अपघात होणार असल्याचं कळाल्यानंतर पायलटने हे विमान गावाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. दाट वस्तीच्या ठिकाणी विमान अपघात झाला असता तर अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका घरावर हे विमान कोसळलं. तेव्हा घराच्या बाहेर मुलं खेळत होती.
#WATCH | Indian Air Force MiG-21 fighter aircraft crashed near Hanumangarh in Rajasthan. The aircraft had taken off from Suratgarh. The pilot is safe. More details awaited: IAF Sources pic.twitter.com/0WOwoU5ASi
— ANI (@ANI) May 8, 2023
या फायटर जेटने सूरतगड एअर बेसवरून उड्डाण घेतलं होतं. उड्डाण घेतल्यानंतर 15 मिनिटात तांत्रिक बिघाडामुळे पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटलं. तरीही या पायलटने विमानाला गावापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही या अपघातात एक महिला ठार झाली आहे. ही महिला जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.