Eknath Shinde : एकनाथ शिंदे नेमके आहेत कुठे? सुरतच्या हॉटेलमधून नार्वेकर दोन मिनिटात बाहेर, अहमदाबाद की गांधीनगर?

| Updated on: Jun 21, 2022 | 5:17 PM

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत भूकंप झाला आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील इतर पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस यावर फारसे बोलायला तयार नाहीत. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असे म्हणत आहेत. शिंदेंचे बंड थंड होईल, असा आशावादही काही जणांनी व्यक्त केला होता.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे नेमके आहेत कुठे? सुरतच्या हॉटेलमधून नार्वेकर दोन मिनिटात बाहेर, अहमदाबाद की गांधीनगर?
एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी सुरतमधल्या ली मेरिडियन हॉटेलबाहेर मिलिंद नार्वेकर
Image Credit source: tv9
Follow us on

सुरत : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मनधरणी करण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मिलिंद नार्वेकर ली मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले. मात्र सुरुवातीला त्यांना हॉटेलच्या आत सोडण्यात आले नव्हते. नंतर ते पुन्हा सुरतच्या या हॉटेलमधून दोन मिनिटांत बाहेर पडले होते. पुन्हा ते ली मेरिडियन हॉटेलमध्ये (Le Meridien Surat) आले. यावेळी बराचवेळ त्यांना बाहेर वाट पाहावी लागली. या सर्व घडामोडींवरून एकनाथ शिंदे नेमके सुरतमध्ये आहेत की गांधीनगरमध्ये अशी चर्चा सुरू झाली होती. ते अहमदाबादला गेल्याचेही बोलले जात होते. मात्र, मिलिंद नार्वेकरांना हॉटेलच्या आत आता प्रवेश देण्यात आला असल्याने एकनाथ शिंदे सुरतच्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत. त्यांच्याशी चर्चा आता मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) शिवसेनेच्या वतीने करणार आहेत.

काय निरोप?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत भूकंप झाला आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील इतर पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस यावर फारसे बोलायला तयार नाहीत. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असे म्हणत आहेत. शिंदेंचे बंड थंड होईल, असा आशावादही काही जणांनी व्यक्त केला होता. तर काही वेळापूर्वी शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमले होते. उद्धव ठाकरेंनी बाहेर येत त्यांना नमस्कार करून पुन्हा आत गेले. या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सुरतला काही वेळापूर्वीच पोहोचले. भाजपा बरोबर सरकार स्थापन करून उपमुख्यमंत्रीपद द्यावे, अशी अट शिंदेंनी घातल्याची चर्चा आहे. त्यामुळे नार्वेकर शिंदेंची समजूत घालणार आहेत.

हे सुद्धा वाचा

संध्याकाळपर्यंत निर्णय?

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या नेतृत्वासमोर काही अटी घातल्या आहेत. या अटी मान्य न झाल्यास संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे काही निर्णय घेऊ शकतात, असे बोलले जात आहे. जवळपास 35 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात येत आहे. शिंदेंच्या या निर्णयानंतर त्यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर तिकडे हॉटेलमधील आमदार आपण अडकले असून लवकर सुटका करावी, असा संदेश पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवत आहेत.