बंगळुरु : भारताच चांद्रयान-3 मिशन मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरलं आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO कडून चंद्रावर वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत. इस्रोने चांद्र मोहिमेत आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. सोमवारी चंद्रावर दुसऱ्यांदा विक्रम लँडरची सॉफ्ट लँडिंग करण्यात आली. तुमच्या मनात प्रश्न येईल की, दुसऱ्यांदा सॉफ्ट लँडिंग कशी काय? विक्रम लँडर 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर उतरला होता, मग दुसऱ्यांदा सॉफ्ट लँडिंग का? खरं म्हणजे इस्रोने चंद्रावर विक्रम लँडरवर एक नवीन प्रयोग केला. त्यात ते यशस्वी ठरले आहेत. ही साधीसुधी गोष्ट नाहीय. ही खूप मोठी कामगिरी आहे. ज्यात इस्रोला यश मिळालय. ज्या लोकेशनवर लँडर होता, तिथून 40 सेमी वर जाऊन म्हणजे उ्डडाण करुन काही अंतरावर पुन्हा लँडिंग केलं.
हा प्रयोग का केला? ते सुद्धा इस्रोने स्पष्ट केलं. भविष्याच्या मिशनच्या दुष्टीने हा प्रयोग आवश्यक होता असं इस्रोकडून सांगण्यात आलं. ISRO कडून सोमवारी एक टि्वट करण्यात आलं. त्यात या प्रयोगाची माहिती देण्यात आलीय. “भारताच्या विक्रमच दुसऱ्यांदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आलं. विक्रम लँडरने आपलं सर्व मिशन पूर्ण केलय. आता त्याच्यावर यशस्वीपणे होप एक्सपीरिमेंट करण्यात आली” ISRO ने सांगितलं की, “कमांड दिल्यानंतर विक्रम लँडरच इंजिन चालू झालं. जमिनीपासून 40 सेमी वर हा लँडर गेला. तिथून पुन्हा 30-40 सेमी अंतरावर जाऊन लँडिंग केलं. भविष्यात लँडरला परत पृथ्वीवर आणणं आणि मानवी मिशनसाठी ट्रायल करणं हा या प्रयोगामागे उद्देश होता” असं इस्रोकडून सांगण्यात आलं.
Chandrayaan-3 Mission:
🇮🇳Vikram soft-landed on 🌖, again!Vikram Lander exceeded its mission objectives. It successfully underwent a hop experiment.
On command, it fired the engines, elevated itself by about 40 cm as expected and landed safely at a distance of 30 – 40 cm away.… pic.twitter.com/T63t3MVUvI
— ISRO (@isro) September 4, 2023
लँडर बद्दल मोठी अपडेट
या नव्या प्रयोगादरम्यान विक्रम लँडरमधील सर्व सिस्टिम व्यवस्थित काम करत होत्या. रंभा, चेस्ट आणि इल्साला बंद केलं आणि पुन्हा त्यांना डिप्लॉय केलं. चंद्रावर प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमध्ये गेल्यानंतर विक्रम लँडरशी संबंधित ही सर्वात मोठी अपडेट आहे. चंद्रावर आत रात्रीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर आहे. फक्त रिसीव्हर सुरु आहे. आता 22 सप्टेंबरला चंद्रावर सूर्यप्रकाश येईल. त्यावेळी पुन्हा रोव्हर, लँडर काम सुरु करणार का? याची उत्सुक्ता आहे. त्यासाठी आता थोड थांबाव लागेल.