मुंबई : मोदी सरकारने दहशतवादी-गुंड-ड्रग स्मगलर यांची कंबर तोडण्यासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) 7 राज्यांमध्ये छापे टाकून अनेकांना ताब्यात घेतले आहे. बुधवारी सकाळी सुरू झालेल्या कारवाईत 53 ठिकाणी छापे टाकण्यात आले. ज्यामध्ये शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला. कॅनडात उपस्थित असलेला खलिस्तानी दहशतवादी अर्श डल्ला आणि लॉरेन्स बिश्नोई, सुखा दुनाके यांसारख्या बड्या गुंडांच्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. दहशतवादी अर्श डल्ला आणि अनेक कुख्यात गुंड यांच्याशी संबंधित दहशतवादी-गुंड-ड्रग तस्कर यांच्या संबंधांवर अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करताना NIA ने अनेक संशयितांना ताब्यात घेतले. पंजाब, यूपी, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये कारवाई करण्यात आली. या गुंडांवर टार्गेट किलिंग, खलिस्तानी समर्थकांना दहशतवादी फंडिंग आणि खंडणीचे आरोप आहेत.
अनेक नावाजलेले गुंड आणि दहशतवादी विविध तुरुंगात बंद आहेत. पाकिस्तान, कॅनडा, मलेशिया, पोर्तुगाल आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये भारताविरुद्ध कट रचत आहेत. अशा लोकांची कंबर तोडण्यासाठी आता मोदी सरकारने मोठी कारवाई सुरु केली आहे.
एनआयएच्या तपासानुसार अनेक बड्या गुंडांच्या टोळ्या भारतात कार्यरत झाल्यानंतर परदेशात पळून गेल्या आहेत. तेव्हापासून ते सातत्याने भारताविरुद्ध कट रचत आहेत आणि आपले मनसुबे यशस्वी करण्यासाठी डावपेच आखत आहेत. खलिस्तानी संघटना टार्गेट किलिंग तसेच अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची तस्करी, हवाला आणि खंडणीचे काम करतात. या गुन्ह्यांमधून ते पैसे गोळा करतात.
NIA ने याच गुंडांवर 370 हून अधिक ठिकाणी असेच छापे टाकले होते, ज्यात 4 प्राणघातक शस्त्रांसह 38 शस्त्रे आणि 1129 राउंड दारूगोळा जप्त करण्यात आला होता. NIA ने आतापर्यंत 87 बँक खाती गोठवली आहेत. आणि 13 मालमत्ता जप्त केल्या आहेत. . याशिवाय 331 डिजिटल उपकरणे, 418 कागदपत्रे आणि दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. राजपत्र पारित करून दोन फरारी आरोपींना दहशतवादी घोषित करण्यात आले असून 15 आरोपींना फरारी गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे, तर अन्य 9 जणांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) जारी करण्यात आली आहे.
अर्शदीप सिंग डल्ला आणि कुख्यात गुंड यांच्यातील संबंध तोडण्याच्या दिशेने ही कारवाई एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. याशिवाय, या पावलामुळे त्यांचा निधी, ड्रग्ज आणि दहशतवादी संबंध तोडण्यासही मदत होईल.