नवी दिल्ली : काश्मीरचा मुद्दा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. त्यावरून अनेकदा राजकारण्यांमध्ये खडाजंगी होताना पहायला मिळेत. मात्र आता मेहबुबा मुफ्तींनी मोदी सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. जम्मू-काश्मीर गांधींचं जम्मू-काशमीर होतं, मात्र आता मोदी सरकारने ते तसं ठेवलं नाही. मोदी सरकारने काश्मीरचं मोठं नुकसान केल्याचा आरोप मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. या सरकारमुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याचंही म्हटलं आहे. स्वातंत्र्यावेळी आजच्यासारखं सरकार असतं तर जम्मू-काश्मीर भारतात नसतं असंही त्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणालेत.
गोडसेचं काश्मीर बनवण्याचं प्रयत्न
मोदी सरकारला जम्मू-काश्मीर गोडसेचं जम्मू-काश्मीर बनवायचं आहे, अशी टीका मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचं कौतुक केलंय. वाजपेयींनी काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम केले, मात्र मोदी सरकारने कलम 370 हटवून काश्मीरचं मोठं नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे, आणि मोदी सरकार नवे काश्मीर बनवल्याचा दावा करत आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.
हा नवा भारत गांधींचा नाही गोडसेचा
भाजप सरकारने भारत गांधींचा ठेवला नाही, हा नवा भारत गोडसेंचा भारत बनवला आहे, असा घणागात त्यांनी केला आहे. लोकांना त्यांच्या जमीनी जाण्याची भिती वाटू लागली, लोकांना त्यांच्या नोकऱ्या जायच्या भीती वाटू लागली असंही मुफ्ती म्हणाल्या आहेत. जे घटनेबाबत बोलतात, त्यांना टुकडे-टुकडे गँग बोलतात, शेतकऱ्यांना खालिस्तानी बोलतात. एखाद्या कॉमेडियनलाही पाकिस्तानी बोलतात, अशीही टीकाही त्यांनी केली आहे. राजकारणासाठी भाजप काहीही करू शकते, भाजप काश्मीर गमावू शकते, शेतकऱ्यांवर गाडी चालवू शकते, असंही त्या म्हणालेत.