देशात सध्या निवडणुकीचा काळ सुरु आहे. सर्वत्र निवडणूक प्रचाराचा आवाज ऐकू येतोय. सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी भाजपा आपल्याबाजूने सर्व प्रयत्न करत आहे. काहीही करुन 400 पार लक्ष्य साध्य करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच भाजपा दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत समाजातील प्रत्येक वर्गाला आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहे. या दरम्यान मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांचा एक वेगळाच अंदाज पहायला मिळाला. इथल्या अलीगंज हैदरी मशिदीत ‘हर हर मोदी, घर घर मोदी’च्या घोषणा देण्यात आल्या.
अलीगंज हैदरी मशिदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. त्यासोबतच ‘मोदी है तो मुमकिन है’ या घोषणा सुद्धा देण्यात आल्या. बोहरा समाजाने मशिदीच्या आत पीएम मोदी यांचे पोस्टर दाखवले. भोपाळमधून भाजपा उमेदवार आलोक शर्मा यांच्या समर्थनार्थ बोहरा समाजाने पीएम मोदी यांच्यासाठी घोषणाबाजी केली. बोहरा समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन ‘अबकी बार 400 पार’ची घोषणा सुद्धा दिली. आमिल जौहर अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरुन कौतुक केलं. त्यांच्या यशसाठी प्रार्थना केली.
भाजपासाठी बोहरा मुस्लिम समाज का महत्त्वपूर्ण?
भाजपाला बहुतांश लोक मुस्लिम विरोधी मानतात. पण पीएम मोदी 400 पारच लक्ष्य गाठण्यासाठी मुस्लिम समुदायाला सुद्धा आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. यात बोहरा समुदाय आणि पसमांदा मुस्लिमांचा विश्वास संपादन करण्याची रणनिती आहे. भाजपासाठी बोहरा मुस्लिम समाज का महत्त्वपूर्ण आहे? या समाजाला स्वत:सोबत जोडण्यासाठी भाजपा का प्रयत्नशील आहे?
कार्यक्रमात सहभागी होणारे मोदी पहिले पंतप्रधान
दाऊदी बोहरा हा मुस्लिमांमधील आर्थिक दृष्टया प्रभावी समाज आहे. भाजपासाठी नेहमीच या समाजाची भूमिका अनुकूल राहिली आहे. पीएम नरेंद्र मोदी आणि बोहरा समाजामध्ये चांगलं नातं आहे. बोहरा समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणारे मोदी पहिले पंतप्रधान होते. या समुदायातील बहुतांश लोक व्यापारी आहेत. यांचा व्यावसायिक समाज पीएम मोदींच समर्थन करतो.
भारतात मुस्लिमांची एकूण लोकसंख्या 20 कोटी आहे
देशात बोहरा मुस्लिम लोकसंख्या 10 लाख आहे.
पीएम मोदी यांचं बोहरा समाजासोबत खास नातं आहे. या लोकसंख्येच समर्थन भाजपासाठी खूप महत्त्वाच आहे.
भारतात दाऊदी बोहरा मोठ्या संख्येने राहतात. अनेक राज्यात यांची चांगली संख्या आहे.
कुठल्या राज्यात बोहरा समुदाय ?
गुजरातमध्ये सूरत, अहमदाबाद, वडोदरा, जामनगर, राजकोट, नवसारी, दाहोद, गोधरा
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर
राजस्थानात उदयपूर, भीलवाडा
मध्य प्रदेशात इंदूर, बुरहानपुर, उज्जैन, शाजापूर
त्याशिवाय कोलकाता, कर्नाटक, चेन्नई, बंगळुरू आणि तेलंगणमध्ये बोहरा समाज वास्तव्याला आहे.