मोहन भागवत, प्रेमजी, सुधा मुर्ती देशावासियांचं ‘आत्मबळ’ वाढवणार; संघाचा कोविड इव्हेंट

| Updated on: May 09, 2021 | 12:45 PM

कोरोनाच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना आत्मबळ मिळावं यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 'पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड' नावाने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. (mohan bhagwat, Premji, Sudha Murthy to speak on Covid at 4-day event)

मोहन भागवत, प्रेमजी, सुधा मुर्ती देशावासियांचं आत्मबळ वाढवणार; संघाचा कोविड इव्हेंट
mohan bhagwat
Follow us on

नवी दिल्ली: कोरोनाच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना आत्मबळ मिळावं यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड’ नावाने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. टीव्हीवरून हा कार्यक्रम दाखविण्यात येणार आहे. विप्रोचे चेअरमन अजीम प्रेमजी, इन्फोसिस फाऊंडेशनच्या चेअरमन सुधा मुर्ती आणि सरसंघचालक मोहन भागवत या कार्यक्रमाला संबोधित करून देशाच्या नागरिकांचं आत्मबळ वाढवणार आहेत. (mohan bhagwat, Premji, Sudha Murthy to speak on Covid at 4-day event)

या कार्यक्रमात सदगुरू जग्गी वासुदेव, श्री श्री रविशंकर, निर्मल संत आखाडाचे ज्ञानदेवजी आणि तिरपंथी जैन समाजाचे जैन मूनी प्राणनाथ या चार दिवसीय कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. चार दिवस प्रत्येक दिवशी दोन व्यक्ती 15 मिनिटं चर्चेत सहभागी होणार आहे. या संकटाच्या काळात पॉझिटिव्ह राहता यावं आणि सर्वांनी एकजूट होऊन कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करावा, यासाठी हा कार्यक्रम होणार आहे.

आपण लढाई जिंकू शकतो

जनतेचं मनोबल उंचावणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तसेच महामारिशी मुकाबला करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणंही त्यामागचा हेतू आहे. आपण लढाई जिंकू शकतो, ही आशा लोकांमध्ये आम्हाला निर्माण करायची आहे, असं संघाच्या कोविड रिस्पॉन्स टीमचे संयोजक निवृत्त लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांनी सांगितलं. संघाच्या कोविड रिस्पॉन्स टीमनेच या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे.

4 लाख नव्या रुग्णांची नोंद

दरम्यान, गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत आहे. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 3 हजार 738 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 92 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 86 हजार 444 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ही संख्या आदल्या दिवसापेक्षा अधिक आहे. आतापर्यंत देशात 1 कोटी 83 लाख 17 हजार 404 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 22 लाख 96 हजार 414 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 42 हजार 362 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 37 लाख 36 हजार 648 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 16 कोटी 94 लाख 39 हजार 663 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण –4,03,738

देशात 24 तासात मृत्यू – 4,092

देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,86,444

एकूण रुग्ण – 2,22,96,414

एकूण मृत्यू – 2,42,362

एकूण डिस्चार्ज – 1,83,17,404

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 37,36,648

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 16,94,39,663 (mohan bhagwat, Premji, Sudha Murthy to speak on Covid at 4-day event)

 

संबंधित बातम्या:

देशाला पीएम आवास नव्हे, श्वास हवा; राहुल गांधींचा हल्लाबोल सुरूच

नियम डावलून कोरोनाबाधिताच्या मृतदेहाचे दफन, त्यानंतर 21 जणांचा मृत्यू; ‘या’ गावाची झोप उडाली

रुग्ण कमी होत आहे म्हणून सुखावून जाऊ नका, तिसरी लाट दारावर, मास्टर प्लान करा: नितीन राऊत

(mohan bhagwat, Premji, Sudha Murthy to speak on Covid at 4-day event)