धर्मशाला: केंद्रातील मोदी सरकारवर आरएसएसचं रिमोट कंट्रोल असल्याची नेहमीच चर्चा असते. या चर्चांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज पूर्ण विराम दिला आहे. मोदी सरकारवर संघाचा रिमोट कंट्रोल नाही, असं मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं आहे.
मोहन भागवत हे हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेत आहेत. या ठिकाणी एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. आमचे काही कार्यकर्ते केंद्रीय सत्तेत आहेत. केंद्र सरकारचं रिमोट संघाच्या हातात असल्याचं मीडियाकडून सांगितलं जातं. पण त्यात तथ्य नाही. हे खोटं आहे. सरकार आमच्या स्वयंसेवकांना कोणतच आश्वासन देत नाही. आम्हाला सरकारकडून काय मिळालं असं विचारलं जातं. या लोकांना मी सांगू इच्छितो की, आमच्याकडे जे काही आहे. ते आम्ही गमावू शकतो, असं भागवत म्हणाले.
गेल्या 40 हजार वर्षापासून भारतातील लोकांचा डीएनए एकच आहे. आमच्या पूर्वजांनी बलिदान दिलं आहे. त्याग केला आहे. त्यामुळे आपली संस्कृती आजही जिवंत आहे. आपला देश प्रगती करत आहे. आपण आपल्या पूर्वजांचंच अनुकरण करत असतो. त्यामुळेच त्यांच्या प्रती आपली निष्ठा आहे, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी प्राचीन उपचार पद्धतीवरही भाष्य केलं. आपल्या परंपरेत पूर्वी काढा घेतला जायचा. आता सर्व जग हेच भारतीय मॉडल स्वीकारत आहे. आपला देश जागतिक महासत्ता बनला नाही तरी विश्व गुरु नक्कीच बनू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.
या कार्यक्रमावेळी तामिळनाडूत हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेले सीडीएस बिपीन रावत यांच्यासह इतर 14 जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारत अनेक लढायांमध्ये आक्रमकांकडून पराभूत झाला आहे. कारण लोक एकजूट नव्हते, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं एक विधान उद्धृत केलं. आपण कोणत्याही शक्तीमुळे पराभूत होत नाही. तर आपल्यातीलच कमकुवतपणामुळे पराभूत होत असतो, असंही ते म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार भागवत हे पाच दिवसाच्या हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर आले आहेत. ते तिबेटी धर्म गुरु दलाई लामांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 19 December 2021#FastNews #News #Headlinehttps://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/gY6mVehqZ8
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2021
संबंधित बातम्या:
आघाडी सरकार हरवलं, शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ; फडणवीसांचा घणाघात
Akola | झोका घेताना झोपाळ्याचा दोर गळ्यात अडकला, तरुणीचा जागीच अंत!