बिहारच्या (Bihar) गया (Gaya) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गया जिल्ह्यातील खिजरसराय परिसरात एका युवकानं अल्पवयीन मुलीचा (Girl) शेतात जाताना विनयभंग केला. यानंतर मुलीनं घाबरलेल्या अवस्थेत संपूर्ण प्रकार घरी जाऊन सांगितला. विनयभंगाचा प्रकार मुलीच्या घरच्यांना कळताच त्यांनी मुकेश कुमार या युवकाच्या घरी जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान, मुकेश कुमार हा प्रचंड रागात होता. यावेळी त्यानं पीडित मुलीच्या घरुन आलेल्या दोन महिलांना (Women) मारहाण आणि शिवीगाळ केली. यावेळी झालेल्या मारहाणीनंतर मुकेश यानं थेट दोन्ही महिलांवर चाकू हल्ला केला. या घटनेत महिलांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाल. बिहारच्या गया जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना जिल्ह्यासह बिहारमध्ये वाऱ्यासारखी पसरली आहे. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी सकाळी शेतात जात होती. याचवेळी युवकानं या मुलीसोबत छेडछाड केली. यानंतर मुलीनं घाबरलेल्या अवस्थेत घर गाठलं. यावेळी विनयभंगाच्या संपूर्ण प्रकाराची माहिती घरच्यांना दिली. यानंतर घरातील दोन महिलांनी संबंधित युवकाचं घर गाठून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी विनयभंग करणारा युवक देखील घरीच होता. रागात असलेल्या युवकानं दोन्ही महिलांना शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर जोरदार चाकून भोसकून दोन्ही महिलांची युवकानं हत्या केली.
मृत दोन्ही महिलांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्न उपस्थित केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात न घेतल्यानं मृत महिलांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गया जिल्ह्यातील धक्कादायक घटनेनंतर लोजपा या पक्षाचे प्रदेश महासचिव अरविंद सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन कुटुबियांचं सात्वन केलंय. यानंतर अरविंद सिंह यांनी बिहार सरकारवरच निशाणा साधत या सरकारच्या काळात काहीही होऊ शकतं, असा आरोप केलाय. दरम्यान, पोलीस आरोपीचा शोध घेत असून ठिकठिकाणी छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे.
विनयभंग करणाऱ्या युवकानं दोन महिलांची हत्या केल्यानं गया जिल्ह्यातील खिजरसराय परिसरात तणाव निर्माण झाला होता. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळ गाठले. आता आरोपीला पकडण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापेमारी करत आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि दोन महिलांच्या हत्येमुळे गया जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर बिहार सरकारवरही आरोप होतायेत.
इतर बातमी