IAS Officer : स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करणं सगळ्यांनाच जमत नाही. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कठोप परिश्रम घ्यावे लागतात. जिद्द ठेवावी लागते तेव्हा त्यात यश मिळतं. आतापर्यंत अनेकांनी मेहनतीच्या जोरावर या परीक्षा उत्तीर्ण करुन दाखवल्या आहेत. कठीण काळात ही जे अशा परीक्षा पास होतात त्या इतरांसाठी प्रेरणा ठरतात. असंच आणखी एक उदाहरण आहे. रुपलने तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली. तिचे वडील दिल्ली पोलिसात एएसआय आहेत. तिच्या यशात त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं ती सांगते.
रुपलची आई अंजू राणा यांनी मुलीचं मनोबल वाढण्याची भूमिका बजावली. अंजू यांनी रुपलला यश मिळावे म्हणून तिला प्रेरणा दिली. पण जेव्हा यूपीएससी मुख्य परीक्षेची तयारी ती करत होती तेव्हाच रुपलची आई आजारी पडली, त्यामुळे रुपलसाठी ती कठीण परिस्थिती होती. आपल्या आजारी आईची काळजी घेत तिने मुख्य परीक्षेची तयारी सुरू ठेवली.
पेपर जवळ आला होता. रुपलकडून तयारी सुरु होती. पण तेव्हाच तिच्या आईचे निधन झालेय. पण यूपीएससीची मुख्य परीक्षा ती उत्तीर्ण झाली. आई-वडिलांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ तिला मिळाले. पण रुपलच्या यशाच्या अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी तिची आई अंजू राणा याचं निधन झालं होतं.
पण या दु:खातही, रुपलचे वडील जसवीर राणा यांनी मुलीला खचू दिले नाही. ते तिच्या पाठीशी उभे राहिले. तिला पाठिंबा दिला आणि तिची ही कामगिरी दिवंगत आईला श्रद्धांजली असेल याची आठवण करून दिली. रुपलच्या बहिणीने सांगितले की, रुपलला तिच्या वडिलांच्या शब्दातून प्रेरणा मिळाली. आई गेल्याच्या दुखातून सावरुन तिने मेहनत सुरु ठेवली. यूपीएससीच्या मुलाखतीत ती यशस्वी झाली. तिला 26 वा क्रमांक मिळाला. तिचे वडील जसवीर राणा, भाऊ ऋषभ राणा आणि बहीण यांनी तिच्या या यशाबाबत आनंद व्यक्त केला.
रुपलची धाकटी बहीण स्वीटी राणा बहिणीच्या यशाबद्दल आनंदी होती पण काही उदास देखील होती. कारण या आनंदाच्या दिवशी तिची आई उपस्थित नव्हती. रुपलचा भाऊ ऋषभ राणा याने तिच्या यशासाठी तिची चिकाटी आणि दृढनिश्चय असल्याचं सांगितले.