मुरैना: आगामी नगरपालिका निवडणुकीची भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर त्यासाठी मुरैनाला पोहोचले. यावेळी दोन्ही नेत्यांनी मुरैनामध्ये दलित कार्यकर्त्याच्या घरी भोजनही केले. मात्र, त्याचवेळी भाजप आणि ज्योतिरादित्य शिंदे समर्थ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. (MP: 2 BJP leaders clash in Morena)
काय आहे प्रकरण?
व्ही. डी. शर्मा आणि नरेंद्र सिंह तोमर रविवारी मुरैना दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी गोटेनगरमध्ये राहणाऱ्या रामवीर निगम या दलित कार्यकर्त्याच्या घरी भोजन केलं. भोजन कार्यक्रमाच्या आधी भाजपचे जिल्हाध्यक्ष योगेश पाल गुप्ता आणि ज्योतिरादित्य शिंदे समर्थक हरिओम शर्मां दरम्यान वाद झाला. दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. ज्येष्ठ नेते भोजन करत असलेल्या दलित कार्यकर्त्यांच्या घरात जाण्यापासून भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदे समर्थकांना रोखले. त्यामुळे शर्मा प्रचंड भडकले आणि शर्मा आणि गुप्ता यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. आजूबाजूच्या लोकांनीही या ठिकाणी गर्दी केली. शेवटी इतर कार्यकर्त्यांना या दोन्ही नेत्यांना आवरावं लागलं.
भाजप नेते बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांना नेहमी भेटत असतात. त्यांच्याशी कायम संवाद ठेवला जातो. भाजपमध्ये सर्वात छोटा कार्यकर्ताही तितकाच महत्त्वाचा आहे. बुथ कार्यकर्त्यांशी संवाद ठेवणं गरजेचं आहे, त्यामुळे आम्ही इथे आलो आहोत, असं तोमर यांनी सांगितलं.
काँग्रेसचा टोला
योगेश पाल गुप्ता आणि हरिओम शर्मा यांच्यातील वादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यावरून काँग्रेसने टोला लगावला आहे. काँग्रेसने ट्विट करून टीका केली आहे. शिंदे समर्थकांची भाजपमध्ये दुर्दशा झाली आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. (MP: 2 BJP leaders clash in Morena)
#WATCH Madhya Pradesh: A verbal spat broke out between Morena BJP president Yogesh Pal Gupta and Hariom Sharma – a supporter of party leader Jyotiraditya Scindia. Sharma was allegedly stopped from entering the house of a party worker where senior leaders had a meal. (14.03.2021) pic.twitter.com/r5iHTXDIxq
— ANI (@ANI) March 15, 2021
संबंधित बातम्या:
भाजप खासदाराच्या घराबाहेर सुनेने हाताची नस कापली; मुलावर गंभीर आरोप
रेल्वे पार्सल व्यवस्थापन प्रमाणीमध्ये अमुलाग्र बदल, संगणकीकरणाचा विस्तार होणार
पश्चिम बंगालमध्ये भाजपची मोठी खेळी, 4 खासदार मैदानात, काय आहे शाहनीती?
(MP: 2 BJP leaders clash in Morena)