भोपाळ, दि. 28 नोव्हेंबर 2023 | पाच राज्यातील निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोरममध्ये निवडणूक प्रक्रिया झाली आहे. आता पाच राज्यांचे निकाल ३ डिसेंबर रोजी येणार आहे. निवडणूक निकालांची सर्वांना उत्सुकता आहे. उमेदवारांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये ही निवडणूक निकालाची उत्सुक्ता जास्त आहे. त्यासाठी पैजा लावल्या गेल्या आहेत. अगदी एका लाखापासून पाच लाखांपर्यंत पैज लावली आहे. पैजचे शपथपत्रही केले आहे. त्यावर पाच जणांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. उमेदवारांच्या समर्थकांनी केलेले शपथपत्र आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याची चांगली चर्चा रंगली आहे.
छिंदवाडा जिल्ह्यात सुखापुरा गावातील धनीराम भलावी आणि नीर मालवीय यांच्यात पैज लागली आहे. भलावी यांनी मध्य प्रदेशात काँग्रेसच्या सरकाराचा दावा केला आहे. मालवीय भाजप सरकार येणार असल्याचे म्हणतात. एक लाख रुपयांची ही पैज आहे. त्यासाठी या दोघांनी शपथपत्रही केले आहे. तसेच एक, एक लाखांचे धनादेश अमित पांडे या साक्षीदाराकडे दिले आहे. मध्य प्रदेशात इतर ठिकाणी या पद्धतीने अनेक पैजा लागल्या आहे. तसेच सट्टा बाजार सुरु झाला आहे.
छिंदवाडमध्ये माजी मुख्यमंत्री कमलनाथ काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्यावर प्रकाश साहू आणि राम मोहन साहू यांनी दहा लाखांची पैज लावली आहे. प्रकाश शाहू म्हणतात भाजपचे उमेदवार बंटी साहू विजयी होतील. तर राम मोहन यांनी कमलनाथ यांच्या विषयावर पैज लावली आहे. या पैजेसाठी तयार केलेल्या शपथपत्रात तीन साक्षीदारांच्या सह्या आहेत. सोशल मीडियावर हे शपथपत्र व्हायरल झाले आहे.