मुकेश अंबानी यांनी घेतले बद्रीनाथचे दर्शन, मंदिर समितीला इतके कोटी रुपये केले दान

| Updated on: Oct 12, 2023 | 3:25 PM

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​प्रमुख मुकेश अंबानी यांनी बद्रीनाथ धाम येथे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची धाकटी सूनही दर्शनासाठी आली होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेदरम्यान मुकेश अंबानी यांनी बाबा बद्रीनाथचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिर समितीला देणगी देखील दिली.

मुकेश अंबानी यांनी घेतले बद्रीनाथचे दर्शन, मंदिर समितीला इतके कोटी रुपये केले दान
Follow us on

 बद्रीनाथ : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​प्रमुख आणि देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी गुरुवारी बद्रीनाथ धाम येथे दर्शन घेतले. यावेळी येथे कडेकोट बंदोबस्तात होता.  मुकेश अंबानी यांच्यासोबत त्यांची सून राधिका देखील उपस्थित होती. मुकेश अंबानी यांच्यासाठी येथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. बद्रीनाथ धामला भेट दिल्यांनंतर अंबानी कुटुंंबाने मंदिरात पूजा केली. यावेळी त्यांनी बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीला (BKTC) 5 कोटी रुपयांची देणगी दिली. पाच कोटी रुपयांचा धनादेशा त्यांनी बीकेटीसीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांच्याकडे सुपूर्द केला.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी उत्तराखंडमधील बद्रीनाथ धाम येथे प्रार्थना केली.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या आगमनामुळे कडेकोट बंदोबस्त होता.  यावेळी त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षकही उपस्थित होते.