उत्तर प्रदेशचा माफीया डॉन मुख्तार अन्सारी याचा गुरुवारी रात्री ह्रदयविकाराने मृत्यू झाला. कारागृहात अचानक त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये नेण्यात आले. परंतु त्याचा मृत्यू झाला. अन्सारी याच्या मृत्यूनंतर त्याच्या हजारो कोटींच्या बेनामी संपत्तीचे काय होणार? यासंदर्भात आता चर्चा सुरु झाली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्तार याच्याकडे 15 हजार कोटींची संपत्ती आहे. परंतु मुख्तार याचा संपूर्ण परिवार कारागृहात आहे. त्याची पत्नी अफशा अन्सारी फरार आहे. त्याची फक्त लहान सून निखत अन्सारी बाहेर आहे. आता अन्सारी परिवार कारागृहातून निघणे अवघड आहे. त्याची आर्थिक तंत्र संपत चालले आहे. त्याची बेनामी संपत्ती सांभाळणारे कोणीच राहिले नाही. मुख्तार अन्सारी नंतर IS-191 गँग कोण चालवणार? हा प्रश्न आहे. त्याच्या साथीदारांमध्येही फूट पडली आहे. उत्तर प्रदेशातच नाही तर मुंबईमध्ये मुख्तार अन्सारीचे हॉटेल आणि जमिनी असल्याचे बोलले जात आहे.
मुख्तार अंसारी गँगवर जवळपास 155 एफआयआर आहे. पूर्वांचल भागात त्याची मोठ्या प्रमाणावर दहशत होती. सरकारच्या नव्हे तर त्याच्या परवानगीशिवाय या भागात एकही ठेका कोणी घेऊ शकत नव्हता. उत्तर प्रदेशात योगी सरकार आल्यापासून त्याच्यावर कारवाईचे सत्र सुरु झाले आहे. सर्व सरकारी संस्थांनी आतापर्यंत त्याची 608 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. तसेच 2100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे त्याचे अवैध व्यवसाय बंद करण्यात आले आहे.
मुख्यार अन्नारी गणेश मिश्राच्या नावावर संपत्ती घेत होता. त्याची पत्नी अफशा अन्सारी हिला आयकर विभागाने चौकशीसाठी जून-2023 मध्ये बोलवले होते. परंतु ती आली नाही. त्यानंतर ती फरार झाली. आयकर विभागाने त्याच्या बेनामी संपत्तीच्या शोधासाठी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेला ‘ऑपरेशन पँथर’ नाव दिले आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लखनौच्या दालीबागमध्ये अन्सारी याच्या बेकायदेशीर मालमत्तेचा पर्दाफाश झाला होता. आयकर विभागाच्या बेनामी शाखेने ऑपरेशन पँथर अंतर्गत मुख्तार अन्सारीची 1.50 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त केली होती. गाझीपूर येथील रहिवासी तनवीर सहार यांच्या नावावर हा निवासी भूखंड ७६ लाख रुपयांना खरेदी करण्यात आला होता. मात्र हा भूखंड सर्वप्रथम मुख्तारची पत्नी अफशा अन्सारीच्या नावे खरेदी करण्यात आला. 2010 मध्ये, मुख्तारने त्याचा जवळचा सहकारी गणेश दत्त मिश्रा यांच्याकडे ते हस्तांतरित करण्यात आला होता.
मुख्यार अन्सारी याच्याकडे हजारो कोटी रुपयांची बेनामी संपती आहे. परंतु 2017 मध्ये दिलेल्या निवडणूक जाहीरनाम्यात त्याने आपल्याकडे फक्त 21.88 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती दिली. तसेच त्याच्यावर 6.91 कोटी रुपये कर्ज असल्याचे म्हटले होते.