उत्तर कन्नड : कर्नाटकातील उत्तरा कन्नड (उत्तरा कन्नड) जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. चवदार सांबार बनवले नाही म्हणून एका तरुणाने आपल्या आई आणि बहिणीला निर्घृणपणे ठार मारले आहे. पार्वती नारायण हसलर आणि रम्या नारायण हसलर अशी मयत मायलेकींची नावे आहेत. तर मंजुनाथ नारायण हसलर असे आरोपी तरुणाचे नाव असून कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी त्याला अटक केली आहे. (Murder of mother and sister by a young man for not making tasty sambar)
आरोपी मंजुनाथ हा मद्यपी असल्याचे पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले. तो अनेकदा घरात भांडणं करीत असे. बुधवारी, जेव्हा तो घरी पोहचला आणि जेवायला बसला, तेव्हा सांभर चवदार झाले नाही म्हणून त्याचे बहीण आणि आईशी भांडण झाले. या व्यतिरिक्त त्याच्या आईला कर्ज घेऊन त्याच्या बहिणीसाठी फोन खरेदी करायचा होता, यालाही त्याचा विरोध होता.
वादाच्या वेळी, आईने मुलगा मंजुनाथला सवाल केला होता की, मी आपल्या मुलीसाठी फोन खरेदी करावा की नाही हे सांगणारा तू कोण आहेस. आईच्या अशा बोलण्यामुळे मंजुनाथ चिडला आणि त्याने घरात ठेवलेल्या देशी बनावटीच्या पिस्तुलाने त्याच्या आई आणि बहिणीवर गोळ्या झाडल्या. विशेष म्हणजे, मंजुनाथचे वडील घरी परतल्यावर ही बाब उघडकीस आली. मंजुनाथचे वडील घरात येताच त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलीला मुलाने ठार मारल्याचे कळले. पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले की, आरोपीविरुद्ध भादंविच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
आईचा खून करुन फरार झालेला मुलगा अखेर गजाआड झाला आहे. श्रीराम नागनाथ फावडे याला बार्शी पोलिसांनी रत्नागिरी येथून ताब्यात घेतले. बार्शी शहरातील वाणी प्लॉट येथे चार दिवसांपूर्वी श्रीरामने जन्मदात्या आईचा खून केला होता. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत उघडकीस आली आहे. रुक्मिणी नागनाथ फावडे (वय 45 वर्ष, रा. वाणी प्लॉट, बार्शी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. श्रीराम नागनाथ फावडे (वय 21 वर्ष) असं आईच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. रात्री झोपेत असताना आईच्या डोक्यात दगड घालून श्रीराम फावडेने आईचा खून केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर मृतदेह गादीसकट बाहेर ओढत आणून झुडपात टाकून तो पसार झाला होता. (Murder of mother and sister by a young man for not making tasty sambar)
ज्या ‘शूर्पणखा”वर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघतंय तिनं रावणाला कोणता शाप दिला होता?https://t.co/MLtiOo4Rg3#Dussehra2021| #HappyDussehra | #Ravaan
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 15, 2021
इतर बातम्या
Video: मांजरीच्या पिलाला रेल्वे ट्रॅकवरुन वाचवलं, लोक म्हणाले, अजून माणुसकी जिवंत आहे!
नवरात्रासाठी मंदिरात बसलेली महिला अचानक ऊसाच्या शेतात गेली, दोन दिवसांनंतरही बेपत्ता