Badruddin Ajmal | ‘बलात्कार, लूटमार, दरोडेखोरीत मुस्लिम नंबर 1’, मुस्लिम नेत्याच धक्कादायक वक्तव्य

| Updated on: Oct 28, 2023 | 9:59 AM

Badruddin Ajmal | एका मुस्लिम नेत्याने आपल्या समाजाबद्दल धक्कादायक वक्तव्य केलय. महत्त्वाच म्हणजे त्याच्या या वक्तव्याचा निषेध होत असतानाही, हे नेता आपल्या वक्तव्यावरुन मागे हटायला तयार नाहीय. तो आजही आपल्या विधानावर ठाम आहे. राजकारणातही या नेत्याची चांगली पकड आहे. त्याच्या पक्षाकडे 15 आमदार आहेत.

Badruddin Ajmal | बलात्कार, लूटमार, दरोडेखोरीत मुस्लिम नंबर 1, मुस्लिम नेत्याच धक्कादायक वक्तव्य
Badruddin Ajmal
Image Credit source: PTI
Follow us on

दिसपूर : एक मुस्लिम नेत्यानेच मुस्लिमांबद्दल धक्कादायक वक्तव्य केलय. मुस्लिम चोरी, दरोडेखोरी, बलात्कार आणि लुटमारीसारख्या गुन्ह्यात आणि जेलमध्ये जाण्यात नंबर 1 आहेत. ऑल इंडिया यूनाइटेड फ्रंटचे (AIUDF) चे चीफ बदरुद्दीन अजमल यांनी हे वक्तव्य केलय. बदरुद्दीन यांच्या या वक्तव्यावर मुस्लिम समुदायाने नाराजी व्यक्त केलीय. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध होतोय, मात्र तरीही बदरुद्दीन आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. ‘मी जे वक्तव केलय, त्यात काही चुकीच नाहीय’ असं बदरुद्दीन अजमल यांचं मत आहे. बदरुद्दीन अजमल यांच्या मते, क्राइम रेटमध्ये मुस्लिमांच प्रमाण जास्त असण्यामागच एक कारण कमी शिक्षण आहे. बदरुद्दीन अजमल यांचा परफ्यूम्सचा व्यवसाय आहे. ते AIUDF चे प्रमुख आहेत.

आसामच्या बंगाली बोलणाऱ्या मुस्लिम भाषिकांमध्ये त्यांना मानणारा एक वर्ग आहे. राजकारणावरही त्यांची चांगली पकड आहे. 126 विधानसभेच्या जागा असलेल्या आसाममध्ये त्यांच्या AIUDF पक्षाचे 15 आमदार आहेत. आसामच्या गोलपारा जिल्ह्यात ते एका कार्यक्रमात बोलत होते. “जगभरात मुस्लिम समुदायामध्ये मला शिक्षणाची कमतरता दिसून आलीय. आपली मुल शिकत नाहीत, उच्चशिक्षणासाठी जात नाहीत. दहावीपर्यंत सुद्धा शिकत नाहीत. शिक्षणाची गरज आहे” असं बदरुद्दीन अजमल म्हणाले.

‘मुलींना पाहून जे उत्तेजित होतात, त्यांनी….’

मुलींच्या सुरक्षेवरुनही बदरुद्दीन अजमल यांनी महत्त्वाची टिप्पणी केली. “मुलांनी मुलींबद्दल चांगला विचार केला पाहिजे. मुलींना पाहून जे उत्तेजित होतात, त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, इस्लाममध्ये हा चांगला व्यवहार मानला जात नाही. घरातल्या स्त्रियांबद्दल जो विचार करता, तोच विचार त्यांनी दुसऱ्या स्त्रियांबद्दल सुद्धा केला पाहिजे” असं बदरुद्दीन अजमल म्हणाले.

मुस्लिमांच्या विकासाच्या मार्गातील अडथळा काय?

‘कमी साक्षरता हा मुस्लिमांच्या विकासाच्या मार्गातील मोठा अडथळा आहे’ असं अजमल मानतात. “शिक्षणाच्या बाबतीत आपण नेहमी सरकारवर आरोप करतो. पण सरकार जेव्हा अल्पसंख्यांकांकडून डॉक्टर्स, इंजिनिअर्सची मागणी करते, तेव्हा मात्र आपण ते देऊ शकत नाही. आपण आपला साक्षरता दर वाढवला पाहिजे. आज जे काही वाईट आहे, ती स्थिती शिक्षण नसल्यामुळे आहे” असं बदरुद्दीन अजमल यांनी सांगितलं.