अहमदाबाद : सामाजिक सलोख्याच एक उत्तम उदहारण समोर आलं आहे. एका मुस्लिम कुटुंबाने राम मंदिराच्या पूनर्बांधणीसाठी मदत केली. तौक्ते चक्रीवादळ या राम मंदिराच नुकसान झालं होतं. मे 2021 मध्ये गुजरातच्या अमरेली जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता. या वादळात बरच नुकसान झालं होतं. अमरेली जिल्ह्यातील झार गावात हे मंदिर बांधण्यात आलं आहे.
काही वर्षांपूर्वी एका मुस्लिम माणसाने आपली जमीन डोनेट केली होती. त्या जमिनीवर हे राम मंदिर उभारण्यात आलं आहे. बुधवारी धार्मिक गुरुंच्या उपस्थितीत हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. झार गावात हिंदू-मुस्लिम सलोख्याने राहतात. दाऊदभाई लालील्या यांच्या कुटुंबाने हीच परंपरा पुढे चालू ठेवलीय.
लाखो रुपये खर्च केले
त्यांनी फक्त मंदिराच्या पुनर्बांधणीसाठीच मदत केलेली नाही, तर मंदिरात जास्तीत जास्त लोकांना येता यावे, यासाठी आपल्या अंगणाचा सुद्धा विस्तार केलाय. मंदिराच्या पूनर्बांधणीसाठी दाऊदभाई लालील्या यांनी लाखो रुपये खर्च केलेत. त्याशिवाय त्यांच्या भाच्याने आपल्याकडची अतिरिक्त जमीनही दिली आहे.
1200 लोकवस्तीच हे गाव
मंदिरात प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दाऊदभाई लालील्या कुटुंबाने संपूर्ण गावासाठी भंडारा आयोजित केला होता. 1200 लोकवस्तीच हे गाव असून 100 मुस्लिम या गावात आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय. दाऊदभाई लालील्या यांच्या घरात संत सभेच आयोजन करण्यात आलं होतं. 10 धार्मिक नेते त्यासाठी उपस्थि होते.
मोरारी बापुंची उपस्थिती हे स्वप्न
“आम्ही परस्परांना हिंदू-मुस्लिम अशी वागणूक देत नाही. सामाजिक सलोखा आमच्या गावची परंपरा आहे” असं दाऊदभाई म्हणाले. अनेक पिढ्यांपासून लालील्या कुटुंब झार गावात राहतेय. गावातील ते श्रीमंत शेतकरी कुटुंब आहे. मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करताना मोरारी बापू उपस्थित रहावेत, हे आपलं स्वप्न होतं, असं दाऊदभाई म्हणाले.