‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन जाताना पाहून केवळ मलाच नाही तर संपूर्ण देशाला आनंद झाला होता. जसे संपूर्ण देश एकत्रित झाला आणि या योद्धांना म्हणाला की तुम्ही विजेते असू शकता. पंतप्रधान म्हणाले, मित्रांनो, यावेळी 15 ऑगस्ट रोजी देश स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी दाखल होत आहे. हे आपले मोठे भाग्य आहे की आपण स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचे साक्षीदार आहोत. ज्यासाठी देशाने शतकानुशतके प्रतीक्षा केली. 15 ऑगस्ट रोजी एक अनोखा प्रयत्न करणार आहोत. या दिवशी शक्य तेवढे भारतीय राष्ट्रगीत गाण्याचा संस्कृती मंत्रालयाचा प्रयत्न आहे. यासाठी राष्ट्रीय गान डॉट कॉम तयार करण्यात आले आहे. या वेबसाइटच्या मदतीने आपण राष्ट्रगीत रेकॉर्ड करता येईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले. देशाच्या प्रत्येक नागरिकानं भारत जोडो आंदोलनाचं नेतृत्व करावं, असं आवाहान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोरोना विषाणू संसर्ग संपला नसल्यानं कोरोना नियमांचं पालन करावं, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
पंतप्रधान म्हणाले, मित्रांनो, यावेळी 15 ऑगस्ट रोजी देश स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी दाखल होत आहे. हे आपले मोठे भाग्य आहे की आम्ही स्वातंत्र्याची 75 वर्षे साक्ष देत आहोत ज्यासाठी देशाने शतकानुशतके प्रतीक्षा केली. तसेच यावेळी सांगितले की, या वेळी 15 ऑगस्ट रोजी एक अनोखा प्रयत्न होणार आहे. या दिवशी शक्य तेवढे भारतीय राष्ट्रगीत गाण्याचा संस्कृती मंत्रालयाचा प्रयत्न आहे. यासाठी राष्ट्रीय गान डॉट कॉम तयार करण्यात आले आहे.
पंतप्रधान म्हणाले की राजकोटमधील लाईट हाऊस फ्रेंच तंत्रज्ञानाने बनविण्यात येत आहेत, ज्यात बोगद्याद्वारे अखंड काँक्रीट बांधकाम तंत्रज्ञान वापरले जात आहे. या तंत्रज्ञानाने बनविलेले घरे आपत्तींचा सामना करण्यास अधिक मजबूत असेल, असं मोदी म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की जेव्हा जेव्हा काही नवीन करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा मानवतेसाठी नवीन दारे उघडली गेली आहेत, एक नवीन युग सुरू झाले आहे. जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो, तेव्हा आपल्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडतात, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
जलसंरक्षण ही आपल्यासमोरील महत्वाची बाब आहे. आपण पाण्याचं संरक्षण करण्याचं काम करणं आवश्यक आहे. कोरोना विषाणू संसर्ग संपलेला नाही, नागरिकांनी कोरोना प्रोटोकॉलचं पालन करावं, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
खादीची खरेदी करणे एकप्रकारे लोकसेवाही आहे आणि देशसेवाही आहे. माझी आपल्याला आग्रही विनंती आहे, की आपण सर्व, माझे प्रिय बंधू-भगिनी, ग्रामीण भागात तयार होणाऱ्या हातमागाच्या वस्तू जरूर खरेदी करा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.
मन की बात कार्यक्रमासाठी 75 टक्के सूचना देशातील 35 वर्ष वयोगटाखालील लोकांच्या सूचना येतात, त्यामुळं आनंदित असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.
I am happy that almost 75% of the inputs for #MannKiBaat come from people under the age of 35, says PM @narendramodi. pic.twitter.com/lw4ondVSDS
— PMO India (@PMOIndia) July 25, 2021
देशाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे. राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी देश प्रथम या भावनेतून काम करणं आवश्यक आहे, असं नरेंद्र मोदी मन की बात मध्ये म्हणाले.
The need of the nation is to unite and work towards national progress.
Nation first, always first! #MannKiBaat pic.twitter.com/rVeVCxDSS4
— PMO India (@PMOIndia) July 25, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की उद्या म्हणजे म्हणजे 26 जुलै हा ‘कारगिल विजय दिवस’ देखील आहे. कारगिल युद्ध हे भारतीय सैन्यातील शौर्य आणि संयम यांचे प्रतीक आहे, जे संपूर्ण जगाने पाहिले आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा सरकारचा नसून देशातील 130 कोटी जनतेचा उत्सव आहे.
Amrut Mahotsav is not about a Government…it is about the sentiments of 130 crore Indians. #MannKiBaat pic.twitter.com/LGSPHmS9qj
— PMO India (@PMOIndia) July 25, 2021
आपण स्वातंत्र्यांच्या 75 व्या वर्षात पदार्पण करत आहोत.
Here is why this 15th August is special. #MannKiBaat pic.twitter.com/S4MQHdfG6k
— PMO India (@PMOIndia) July 25, 2021