प्रशांत किशोरनंतर या जागतिक तज्ज्ञाने भारतीय निवडणुकीसंदर्भात केले भाकीत, लोकसभेची बाजी कोण मारणार सांगितले

| Updated on: May 23, 2024 | 4:01 PM

lok sabha election 2024 : भाजपला या निवडणुकीत 295 ते 315 जागा मिळणार आहे. माझे लक्ष संख्यांमध्ये नाही तर जगभर होणाऱ्या विविध निवडणुकींकडे आहे. गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पातळीवर निश्चितपणे चांगली कामगिरी केली आहे.

प्रशांत किशोरनंतर या जागतिक तज्ज्ञाने भारतीय निवडणुकीसंदर्भात केले भाकीत, लोकसभेची बाजी कोण मारणार सांगितले
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्याकडे आली आहे. सात टप्प्यातील या निवडणुकीचे आता दोन टप्पेच राहिले आहेत. देशात ही निवडणूक एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी होत आहे. यापैकी कोण सत्तेवर येणार? कोणत्या आघाडीला किती जागा मिळणार? यासंदर्भात भारतात चर्चा रंगली आहे. या चर्चेत अमेरिकेतूनही भविष्यवाणी करण्यात आली आहे. अमेरिकन विशेषज्ञाने या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए आघाडीला प्रचंड यश मिळणार असल्याचे यूरेशिया ग्रुपचे फाउंडर इयान ब्रेमर यांनी म्हटले आहे.

भाजप पुन्हा सत्तेत

एनडीटीव्ही प्रॉफिटला इयान ब्रेमर यांनी मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत ब्रेमर यांनी भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. लोकसभा 2024 मध्ये भाजप 305 जागा मिळणार आहे. त्यात 10 सीट कमी जास्त होऊ शकतात, असे ब्रेमर यांनी म्हटले आहे. ब्रेमर यूरेशिया ग्रुपचे संस्थापक असून जगभरातील निवडणुकांकडे त्याचे लक्ष असते. जगभरातील निवडणुका पाहिल्यावर भारतात होणारी लोकसभा निवडणूक सुसंगत आणि पारदर्शक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नरेंद्र मोदींचे केले कौतूक

ब्रेमर यांना भारतातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणाले, भाजपला या निवडणुकीत 295 ते 315 जागा मिळणार आहे. माझे लक्ष संख्यांमध्ये नाही तर जगभर होणाऱ्या विविध निवडणुकींकडे आहे. गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पातळीवर निश्चितपणे चांगली कामगिरी केली आहे. ते स्वबळावर तिसऱ्यांदा सत्ता मिळवणार आहे.

हे सुद्धा वाचा

प्रशांत किशोर यांचा दावा

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. आता 370 जागा भाजपला आणि एनडीएला 400 जागा मिळतील असा दावा भाजपने केला आहे. भारतीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा नरेंद्र मोदी सत्तेवर येणार असल्याचे नुकतेच म्हटले होते. मागील निवडणुकीप्रमाणे जागा त्यांना मिळणार असल्याची भविष्यवाणी प्रशांत किशोर यांनी केली होती. मोदींच्या नेतृत्वात भाजप पुन्हा सत्ता स्थापन करेल. गेल्या निवडणुकीप्रमाणेच त्यांना किंवा त्याहून किंचित जास्त जागा भाजपला मिळू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.