नवी दिल्ली : संसदेची नवीन इमारत नव्या भारताचे प्रतिक बनली आहे. नवीन संसद भवन पाहून प्रत्येक भारतीयाला गर्व वाटत आहे. या नवीन संसद भवनात संस्कृती आहे अन् संविधानसुद्धा आहे. आता नवा भारत नवीन उद्दिष्टे ठरवत आहे. नव्या भारतात नवा उत्साह आहे, नवा प्रवास आहे. नवा विचार, नवी दिशा, नवी दृष्टी आहे अन् नवा संकल्प आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले. संसदेच्या नवीन भवनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नवीन मार्गावर जाऊन नवीन कीर्तिमान होत असल्याचे सांगत त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादावर काही न बोलता सर्वच सांगून दिले. यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या नऊ वर्षींची कामगिरीही मांडली.
प्रत्येक देशाच्या विकास यात्रेत काही क्षण असे येतात, जे कायमस्वरुपी अमर होतात. आज 28 मे 2023 चा दिवस असाच शुभअवसर आहे. देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचा अमृतमहोत्सव साजरा करतोय, अन देशाला नवीन संसद भवन मिळत आहे. हे नवीन भवन विकसित भारताच्या संकल्पाची सिद्धी पाहणार आहे. हे फक्त एक भवन नाही. 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षाच प्रतिबिंब आहे. नवीन संसद भवन हे जगाला भारताच्या दृढ संकल्पाच संदेश देणारं मंदिर आहे.
काय म्हणाले मोदी