देशात काँग्रेसने ओबीसीच्या मुद्यावरुन मोदी सरकारला घेरले. आता तोच मुद्दा घेऊन भाजपने विरोधकांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली आहे. त्यात मोदींनी रात्रीतूनच मुस्लिमांना दिलेल्या आरक्षणावरुन काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला.
सौदा झालाय का? मोदींचा मोठा प्रश्न
काँग्रेसने अपीजमेंट पॉलिटिक्ससाठी. एक सत्तेसाठी तर दुसरं अपीजमेंटसाठी. सत्तेसाठी संविधानाचा वापर केला तर दुसरा व्होट बँक पॉलिटिक्ससाठी केला. माझ्या मनात तर प्रश्न येतो. मीडियाला सांगतो शोधा. वायनाडमध्ये डील झालीय का? माझ्या मनात प्रश्न आहे. वायनाडमध्ये डील झालीय का. तुम्हाला मुसलमानांना आरक्षणात हिस्सा देणार आहे का. त्या बदल्यात वायनाडमध्ये सौदा झालाय का? बदल्यात निवडणुका जिंकू द्या असा सौदा झालाय का. देशाला जाणून घ्यायचा आहे. असा घणाघात मोदींनी काँग्रेसवर केला.
एसटी,ओबीसींच्या आरक्षणाला धक्का
आज खेळ काय चाललाय. एसएसटी ओबीसींना संविधानात जे आरक्षण देण्यात आलं आहे. ते आरक्षण काढून टाकण्याचा मार्ग शोधला जात आहे, अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली. त्यांना धर्माच्या आधारे आरक्षण द्यायचं आहे. जेव्हा संविधान तयार झालं. तेव्हा महिनोन् महिने चर्चा झाली. देशातील विद्वानांनी चर्चा केली आणि धर्माच्या आरक्षणाला विरोध केल्याचे स्मरण त्यांनी काँग्रेसला करुन दिले.
हे तर वोट पॉलिटिक्स
धर्माच्या आधारे आरक्षण देऊ शकतो का. सर्वांची संमती झाली. धर्माच्या आधारे आरक्षण देणार नसल्याचं सर्वांनी ठरवलं. बाबासाहेब आंबेडकरांनी तर विद्वतापूर्ण बाजू मांडली आहे. धर्माच्या आधारे आरक्षण देऊ नये असं सर्वांचं मत राहीलं आहे. पण ते धर्माच्या आधारे आरक्षण द्यायला लागले कारण व्होट बँक पॉलिटिक्स. कर्नाटकात तर एक नवीन प्रयोग केला. कर्नाटकात काय केलं. रातोरात सर्व मुस्लिम जातींना फतवा काढून ओबीसी केलं. एक सर्क्युलर काढलं. शिक्का मारला. २७ टक्के ओबीसींचं आरक्षण होतं, त्याचे सर्वात मोठे भागीदार हे बनले. त्यांचं आरक्षण लुटलं. डाका टाकला. त्यांच्यासाठी संविधान हा एक खेळ आहे.
काश्मिरमध्ये संविधान का लागू केलं नाही?
देशात ७५ वर्षात भारताचं संविधान लागू झालं आहे का. जे लोक बोलत आहेत, ते बेईमानी करत आहेत. ६० वर्ष यांनी राज्य केलं. काश्मिरात भारताचं संविधान लागू होत नव्हतं. जर संविधानाचं तुम्हाला एवढं पावित्र्य वाटत होतं, तर काश्मीरमध्ये तुम्ही संविधान का लागू केलं नाही. ३७० ची भिंत बांधून भारताचं संविधान का अडकवून ठेवलं. हा बाबासाहेबांचा अपमान आहे की नाही. जम्मू काश्मीरमध्ये जो दलित समाज आहे. त्यांना गेल्या ७५ वर्षात आरक्षण मिळालेलं नाही. कोणताही अधिकार मिळाला नाही. त्यावेळी यांना रडू कोसळलं का नाही. तिथे आदिवासी आहेत. त्यांनाही अधिकार नाही मिळाला. त्याबद्दलही यांना रडू कोसळलं नाही. आमच्या आयाबहिणी आहेत. त्यांना कोणताच अधिकार नाही. कारण तिथे संविधान नव्हतं. त्यांचं संविधान होतं. मी संविधानाची सर्वात मोठी सेवा केली, असे मोदी म्हणाले.
हत्तीवरुन संविधानाची यात्रा
जम्मू काश्मीरात ३७० हटवून मी देशाच्या संविधानाची सर्वात मोठी सेवा केली आहे. संविधानाच्या प्रती माझं समर्पण पाहा. भारताच्या संविधानाला ६० वर्ष झाले. तेव्हा मी गुजरातमध्ये हातीवर संविधानाची मोठी प्रत ठेवली, पूजा केली. मोठी यात्रा काढली. हत्तीवर केवळ संविधान होते. आणि राज्याचा मुख्यमंत्री पायी चालत होता. कारण मला देशाच्या मनात केवळ संविधान ठसवायचं होतं. मला संविधानाची प्रतिष्ठा वाढवायची होती,असे ते म्हणाले.