PM Modi TV9 Interview : विरोधकांची उडवली झोप, ट्रेलरनंतर कोणता दाखवणार मोदी पिक्चर, TV9 च्या महामुलाखतीत खास उत्तर

| Updated on: May 03, 2024 | 9:12 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक सभा, रॅलीमधून विकासाचा तर हा केवळ ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी असल्याचा दावा करतात. मग त्यांचा हा 10 वर्षांतील विकासाच ट्रेलर असेल तर पिक्चर काय असेल, TV9 च्या महामुलाखतीत PM मोदींनी काय दिलं उत्तर

PM Modi TV9 Interview : विरोधकांची उडवली झोप, ट्रेलरनंतर कोणता दाखवणार मोदी पिक्चर, TV9 च्या महामुलाखतीत खास उत्तर
हा ट्रेलर तर पिक्चर काय
Follow us on

या लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामात विकासाचा ट्रेलर आणि पिक्चरची बरीच चर्चा सुरु आहे. गेल्या 10 वर्षांतील विकास हा मोदींचा ट्रेलर आहे. तर विकासाचा खरा ट्रेलर समोर येईल, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिलीय. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली. त्यावेळी मोदींनी पिक्चर काय असेल यावर उत्तर दिले.

काय आहे पिक्चर

TV9 नेटवर्कच्या महामुलाखतीत मोदींना या प्रश्नाचं उत्तर दिलं. विरोधकांची झोप उडण्याचं कारण नाही. एवढा मोठा देश.दहा वर्षात मी जे केलं, त्यामुळे माझा विश्वास वाढला आहे. पण माझी जी विचार करण्याची पद्धत आहे. मला खूप काही करायचं आहे. मी देशाला सांगतो. तुम्हाला आनंद वाटेल. तुम्ही मोदींवर प्रेम करता, मोदींना आशीर्वाद देता. पण मोदी झोपणार नाही. मी देशाला अजून उंचीवर नेणार आहे. मी अनेक नव्या गोष्टी करणार आहे. मला जगात हिंदुस्थानचा जयजयकार करायचा आहे, असे मोदी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

ही तर शब्दांची खेळी

देशातील जनता समजदार आहे. त्यांचा प्रत्येक डाव जाणून आहे हे त्यांना माहीत नाही. ते पाच गॅरंटी आणो, २५ गॅरंटी आणू द्यात, ७५ गॅरंटी आणूद्यात त्यांना शब्द वर खाली करू द्या, वेडंवाकडं बोलू द्या. त्यामुळे जनमत बनत नाही. त्यामुळे तुम्हाला टीव्ही मीडियात प्रसिद्धी मिळते. पण लोकांच्या मनात जागा मिळत नाही, असे चिमटा मोदींनी विरोधकांना काढला.

माझा प्रत्येक शब्द गॅरंटी

गॅरंटी या शब्दावर मोदींनी विरोधकांची पिसं काढली.सर्वच राजकीय नेते आपल्या आपल्या पक्षाचा जोरदार प्रचार करताना दिसताय पण सध्या जनतेसमोर मोदींची गॅरंटी आहे तर दुसरीकडे आमचं सरकार आलं तर एका झटक्यात गरीबी दूर करू, अशी राहुल गांधीही गॅरंटी देत आहे. देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? असा सवाल मोदींना केला असता ते म्हणाले, गॅरंटी शब्दावर माझा कॉपीराईट नाही. गॅरंटी अशी मिळत नाही. मोठ्या तपश्चर्येनंतर तुमचे शब्द गॅरंटी बनतात. तुमच्या शब्दाला किंमत मिळते. माझा प्रत्येक शब्द एक जबाबदारी आहे. माझा प्रत्येक शब्द हा एक गॅरंटी आहे. त्या रुपात मी करतो. बाकी लोक तो शब्द वापरत आहेत, त्याबद्दल मी काही बोलत नाही.

त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार

पण मला सांगा, त्यांचे आजोबा, पणजोबा त्यांचे भाषण ऐका. ते गरीबीवर बोलायचे, त्यांची आजी गरीबीवर बोलायची. त्यांचे वडील गरिबीवर बोलायचे. त्यांची आई जेव्हा रिमोट सरकार चालवायची तेव्हाही गरीबीच्या गोष्टी करत होत्या. आता बोलत आहेत आम्ही एका झटक्यात गरीबी दूर करू. आम्ही फटाफट गरीबी दूर करू. कोण विश्वास ठेवणार? असा सवालही मोदींनी केला आहे.