देशात लोकशाही संपणार. संविधान बदलणार. देशात हुकुमशाही येणार, हुकूमशाह येणार असा विरोधकांकडून भाजपवर हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपच्या 400 पार नाऱ्याने सुद्धा जनता भयभीत असल्याचा प्रचार करण्यात येत आहे. देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर मुलाखत दिली. या महामुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांवर थेट मत व्यक्त केले. देशात खरंच हुकुमशाही येणार आहे का? या प्रश्नाला बगल न देता, त्यांनी सडेतोड उत्तर दिले.
विरोधकांकडे नवीन मुद्या नाही
२०१४मध्येही असंच म्हटलं गेलंय. ही निवडणूक शेवटची आहे. २०१९मध्येही म्हटलंय की ही निवडणूक शेवटची आहे. आता २०२४मध्येही तेच म्हणत आहेत. याचा अर्थ विरोधकांची बँकरप्सी आहे. त्यांच्याकडे कोणताही नवा मुद्दा नाही. जी गोष्ट होणार नाही. होणार नाही, संभावना नाही, त्यावर काय बोलायचं.
हुकूमशाह ढगातूनही निर्माण होणार नाही
या देशात एवढा मोठं संविधान आहे, देशात ९०० टीव्ही चॅनल्स चालतात तिथे हुकूमशाह जन्मालाच येऊ शकत नाही. ढगातून येऊनही निर्माण होऊ शकत नाही. ज्या देशात न्यायालय एवढं व्हायब्रंट आहे, तिथे हुकूमशाह कधीच निर्माण होऊ शकत नाही. तो जमाना गेला. १९७५मध्ये देशाने एक संकट झेललं. पुन्हा ते संकट येणार नाही, असे सडेतोड उत्तर त्यांनी विरोधकांच्या आरोपांना दिले.
संविधानाला नष्ट करण्याचे प्रयत्न
दुसरं यांनी काय केलं? असा घणाघात त्यांनी काँग्रेसवर घातला. आपलं न्यायलय. संविधानाने जन्म न्यायालयाला जन्म दिला. शहाबानो केस आली तेव्हा व्होट बँकेसाठी संविधानाला समर्पित केलं. सुप्रीम कोर्ट ही संविधानाची मोठी संस्था आहे. त्याच्या भावनेकडे दुर्लक्ष करून संविधानच बदललं. इलहाबाद कोर्टाने निर्णय दिला. त्यांची निवडणूक रद्द केली. त्यांनी संविधानाला कचऱ्यात फेकलं. आणीबाणी लागू केली. त्यांनी संविधानाचा उपयोग केवळ आणि केवळ आपल्या एकाधिकारासाठी केला. देशातील सरकारांना ३५६ चा वापर करून शंभर वेळा त्यांनी खतम केलं. एका पंतप्रधानांनी तर एकट्याने ५० वेळा केलं. यांच्याच कुटुंबातील हा पंतप्रधान आहे. तर संविधानाला पूर्णपणे नष्ट करणं यांचं काम त्यांनी केलं, असा घणाघात त्यांनी काँग्रेसवर केला.