पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. पंतप्रधान मोदींनी आज वाराणसीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यावेळीही दोन जागांवरून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. वायनाड मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान पार पडले आहे. तर रायबरेलीच्या जागेवर २० मे रोजी मतदान होणार आहे. तर 1 जूनला शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदींच्या वाराणसी जागेसाठी मतदान होणार आहे. पीएम मोदींनी आज जेव्हा त्यांचं प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यात त्यांनी त्यांच्या संपत्तीची ही घोषणा केली आहे. जाणून घेऊयात राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे किती संपत्ती आहे.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्पन्नाचा प्राथमिक स्त्रोत म्हणजे त्यांचे सरकारी वेतन आणि त्यांच्या बचतीवरील व्याज.
– राहुल गांधी यांचा उत्पन्नाचा स्त्रोत खासदारांचा पगार, रॉयल्टी, भाडे, रोख्यांचे व्याज, लाभांश आणि म्युच्युअल फंडातील भांडवली नफा
-प्रतिज्ञापत्रानुसार, पंतप्रधान मोदींकडे एकूण 52 हजार 920 रुपये रोख स्वरूपात आहेत.
-प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल गांधींकडे सध्या 55 हजार रुपये रोख आहेत.
-पीएम मोदींच्या स्टेट बँक ऑफ गांधीनगरच्या खात्यात 73 हजार 304 रुपये जमा आहेत. वाराणसीच्या बँक खात्यात एकूण 7000 रुपये जमा आहेत.
-काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बँक खात्यात २६ लाख २५ हजार रुपये जमा आहेत.
-पीएम मोदींच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात 2 कोटी 85 लाख 60 हजार 338 रुपयांची मुदत ठेव (एफडी) आहे. पीएम मोदींकडे राष्ट्रीय बचत योजनेत (NSS) ९ लाख १२ हजार ३९८ रुपये आहेत.
-राहुल गांधी यांच्याकडे राष्ट्रीय बचत योजना (NSS), पोस्टल बचत आणि विमा पॉलिसीद्वारे सुमारे 61.52 लाख रुपये जमा आहेत.
-राहुल गांधी यांनी शेअर मार्केटमध्ये एकूण 4.33 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांनी म्युच्युअल फंडात 3.81 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. राहुल यांनी त्याच्या स्टॉक पोर्टफोलिओमध्ये ITC, ICICI बँक, Alkyl Amines, Asian Paints, Bajaj Finance, Deepak Nitrite, Divi’s Laboratories, Infosys, Tata Consultancy Services (TCS), Britannia Industries आणि Titan Company मध्ये पैसे गुंतवले आहेत.
– पंतप्रधान मोदींनी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात कोणतीही गुंतवणूक केलेली नाही.
-पीएम मोदींकडे 4 सोन्याच्या अंगठ्या आहेत. त्यांची किंमत 2 लाख 67 हजार 750 रुपये आहे.
-राहुल गांधी यांच्याकडेही 4.2 लाख रुपयांचे 333.3 ग्रॅम सोने आहे. त्यांच्याकडे 15,21,740 रुपयांचे सोन्याचे रोखेही आहेत.