दिल्ली – दिल्ली येथील इंडिया गेटवर (INDIA GATE) सुभाषचंद्र बोस (SUBHASHCHNDRA BOSE) यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI) यांनी केली आहे. नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र ट्विट करून ही संपुर्ण भारतीय जनतेला दिली आहे. जोपर्यंत नेताजी बोस यांचा भव्य पुतळा तयार होत नाही, तोपर्यंत त्यांचा होलोग्राम पुतळा त्याच ठिकाणी उपस्थित उभारणार त्यांनी ट्विटमध्ये सांगितले.
At a time when the entire nation is marking the 125th birth anniversary of Netaji Subhas Chandra Bose, I am glad to share that his grand statue, made of granite, will be installed at India Gate. This would be a symbol of India’s indebtedness to him. pic.twitter.com/dafCbxFclK
— Narendra Modi (@narendramodi) January 21, 2022
23 जानेवारीला नेताजींच्या जयंतीदिनी मी होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे सुध्दा ते म्हणटले आहेत, “ज्या वेळी संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करत आहे, तेव्हा मला कळवायला आनंद होत आहे की, इंडिया गेटवर त्यांचा ग्रॅनाइटचा भव्य पुतळा बसवला जाईल.”
Till the grand statue of Netaji Bose is completed, a hologram statue of his would be present at the same place. I will unveil the hologram statue on 23rd January, Netaji’s birth anniversary. pic.twitter.com/jsxFJwEkSJ
— Narendra Modi (@narendramodi) January 21, 2022
भाजपकडून सैनिकांच्या बलिदानाचा इतिहास पुसून टाकण्याचं काम सुरू आहे असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की, ‘आमच्या शूर जवानांसाठी जी अमर ज्योती जळत होती ती आज विझली जाईल हे अतिशय दुःखद आहे. तसेच काही लोकांना देशभक्ती आणि त्याग समजू शकत नाही, हरकत नाही. आम्ही आमच्या सैनिकांसाठी अमर जवान ज्योती पुन्हा एकदा जाळू असं राहूल गांधींनी ट्विटमध्ये म्हणटलं आहे.