नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधींच्या (Rahul Gandhi)गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या चौकशी समाधानकारक उत्तरे ईडीला (ED enquiry)मिळत नसल्याची माहिती आहे. अशा स्थितीत यंग इंडियातील (Young India)असोसिएटेड जर्नली सुमारे ५ हजार कोटींची संपत्ती जप्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. आता यातून राहुल यांना काही ब्रेक मिळाला असला तर पुन्हा त्यांची चौकशी होणार आहे. यापूर्वी मल्लिकार्जुन खर्गे आणि पवन बन्सल यांच्या चौकशीतही त्यांच्या उत्तराने ईडीचे समाधान झाले नव्हते. या दोन्ही नेत्यांनी एप्रिल मध्ये चौकशी करण्य़ात आली होती. ईडीच्या एका अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, असोसिएटेड जर्नलचे पूर्ण प्रकरण हे पैशांच्या अफरातफरीचे योग्य उदाहरण आहे. अशा स्थितीत समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, तर बैकायदेशीररित्या बळकावलेल्या पूर्ण संपत्तीवर कब्जा केला जाऊ शकतो. या प्रकरणात कायदेशीर तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच, आणि शंकांचे पूर्म समाधान झाल्यानंतरच या प्रकरणात मनी लाँड्रिंग रोखण्याच्या कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
या प्रकरणात कोणताही एफआयआर दाखल केल्याविना हे मनी लाँड्रिंगचे प्रकरण केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका वनृत्तसंस्थेकडे स्पष्ट केले आहे की, या प्रकरणी कोर्टात कलम ४२० आमि १२० ब च्या अंतर्गत याआधीच हे प्रकरण गेले होते. त्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जामीन घ्यावा लागला होता. या दोन कलमांमुळे या प्रकरणात ईडीला कारवाईचा अधिकार मिळू शकतो.
Enforcement Directorate today issued fresh summons to Congress leader Rahul Gandhi to join the investigation in the National Herald case on June 20, granting his request to the agency considering the illness of his mother and interim Congress president Sonia Gandhi: ED sources
— ANI (@ANI) June 16, 2022
या प्रकरणात असोसिएटे़ड जर्नलला काँग्रेसकडून ९० कोटी रुपयांचे कर्ज दिले जाणे, हे ९० कोटींचे कर्ज ५ लाख रुपयांनी निर्माण केलेल्या यंग इंडियाला विकणे, त्यानंतर असोसिएटेड जर्नली पूर्ण संपत्ती यंग इंडियाच्या हवाली करण्यात येणे आणि त्यानंतर असोसिएटेड जर्नलचे ९० कोटींचे कर्ज माफ करणे, या सर्व निर्णयांबाबत राहुल यांना विचारणा केली असता याची माहिती नसल्याचे राहुल यांनी सांगितले आहे. या सगळ्या निर्णयांची माहिती मोतीलाल व्होरा यांना होती असे राहुल यांनी ईडीला सांगितले आहे.
मोतीलाल व्होरा या सर्व प्रकरणाच्या काळात काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते तसेच असोसिएटेड जर्नलचे अध्यक्षही होते. मात्र २०२० साली त्यांचा मृत्यू झाला आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि पवन बन्सल यांनीही या निर्णयांची माहिती नसल्याचे सांगत मोतीलाल व्होरा यांचेच नाव घेतले होते. यंग इंडियाची ७६ टक्के मालकी सोनिया आणि राहुल यांच्याकडे आहे. आता या प्रकरणात केवळ सोनिया गांधी यांचीच चौकशी होणे अजून बाकी आहे. त्यांना २३ जूनला बोलावण्यात आले होते. मात्र कोरोना संक्रमणामुळे सोनिया गंगाराम हॉस्पिटलमध्ये उपचर घेत असल्याने हा अवधी वाढवला जाऊ शकतो. सोनिया यांच्या चौकशीनंतर या सर्व प्रकाराचे ईडी विश्लेषण केरल आणि त्यानंतर संपत्ती जप्त करण्याचा निर्णय होऊ शकतो. दरम्यान मोतीलाल व्होरा यांचे पुत्र अरुण व्होरा यांनी राहुल त्यांचा वडिलांवर असे आरोप लावणार नाहीत, तसेच राहुल गांधी विजयी होऊन बाहेर येतील, अशी प्रतिक्रिया दिल्याची माहिती आहे.