मुंबई : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे राष्ट्रीय महामार्ग 53 वर एकाच मार्गिकेमध्ये 75 किमीचा बिटुमिनस काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला आहे. तो केवळ 105 तास आणि 33 मिनिटांत पूर्ण करण्यात आला आहे. या नव्या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) नोंद झाली आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली आहे.
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक जागतिक विक्रम केला असून त्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे,अशी माहिती गडकरी यांनी आज चित्रफितीच्या माध्यमातून दिलेल्या संदेशात दिली आहे.
Proud Moment For The Entire Nation!
Feel very happy to congratulate our exceptional Team @NHAI_Official, Consultants & Concessionaire, Rajpath Infracon Pvt Ltd & Jagdish Kadam, on achieving the Guinness World Record (@GWR) of laying 75 Km continuous Bituminous Concrete Road… pic.twitter.com/hP9SsgrQ57
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 8, 2022
अमरावती ते अकोला जिल्ह्यांदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 53 वरील एका मार्गिकेमध्ये 75 किमीचा बिटुमिनस काँक्रीटचा रस्ता 105 तास आणि 33 मिनिटांत पूर्ण करण्याचा विक्रम करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.एका मार्गिकेमधील अखंड बिटुमिनस काँक्रीट रस्त्याची एकूण 75 किमी लांबी शेजारील दुपदरी पक्क्या रस्त्याच्या 37.5 किमी लांबीच्या समतुल्य आहे आणि हे काम 3 जून 2022 रोजी सकाळी 7:27 वाजता सुरू झाले आणि 7 जून 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता पूर्ण झाले, असे त्यांनी सांगितले.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील एका मार्गिकेमध्ये 105 तास आणि 33 मिनिटांत 75 किमीचा बिटुमिनस काँक्रीट रस्ता 105 तास आणि 33 मिनिटांत पूर्ण करत नव्या नव्या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली.
या रस्त्यासाठी 2,070 मेट्रिक टन बिटुमिन असलेले 36,634 मेट्रिक टन बिटुमिनस मिश्रण वापरण्यात आले आहे, असे मंत्री म्हणाले. हे काम पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र सल्लागारांच्या चमूसह 720 कामगारांनी रात्रंदिवस काम करून हा प्रकल्प पूर्ण केला असल्याचे त्यांनी सांगितले.
याआधी फेब्रुवारी 2019 मध्ये कतारमधील दोहा येथे 25.275 किमी लांबीचा अखंड बिटुमिनस रस्ता बांधण्याच्या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली होती हे काम पूर्ण होण्यासाठी 10 दिवस लागले होते, असे गडकरी यांनी सांगितले.