पंजाब विधानसभेत गुरूवारी मोठा गदारोळ झाला. सत्ताधारी काँग्रेस सरकारने मंजूर केलेल्या काही कायद्यांवरून गदारोळ सुरू झाला होता. मात्र, सभागृहात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली जेव्हा मुख्यामंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) नेते बिक्रम सिंह मजिठिया यांच्या विरोधात काही वक्तव्य केली. केंद्राच्या तीन नवीन शेती कायद्यांविरुद्धच्या ठरावाबाबत मुख्यमंत्री बोलत होते. नवीन शेती कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या वर्षभरापासून आंदोलन करत आहेत. काँग्रेस आणि एसएडी पक्षांच्या आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली व गोंधळ ईतका वाढला की सभापतींना सभागृहाचे कामकाज तीनदा तहकूब करण्यास भाग पडले.
सभागृहाच्या झालेल्या गदारोळाचा निषेध केरत पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, विरोधी पक्षानी जाणूनबुजून सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणला. विरोधक घाबरले आहेत. काँग्रेसकडून ज्या काही घोषणा करण्यात आल्या आहे त्या पुढील 5 वर्षांच्या दृष्टीने आहेत, 2-3 महिन्यांसाठी नाही, सिद्धू यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पंजाबमध्ये 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
Centre’s 3 Black Laws are a building built upon foundation laid down by Akali Dal’s 2013 Contract Farming Act … Two sides of the same coin, Twin Brothers !! https://t.co/8qEq510cjN
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) November 10, 2021
दरम्यान, माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आज पंजाब विधानसभेने सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) अधिकारक्षेत्राचा विस्तार करण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात मांडलेल्या ठरावाला विरोध केला. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या अधिकाराचे उल्लंघन होत नाही. बीएसएफचे कार्यक्षेत्र हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा नाही. राज्य सरकारने क्षुल्लक हेतूंसाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचे राजकारण करू नये,” सिंग म्हणाले.
पंजाबमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे. काँग्रेसमध्ये असलेल्या अमरिंदर सिंह यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिला आणि स्वःताचा नवीन पक्ष स्थापन केला आहे. येत्या निवडणुकीत ते भाजपसोबत जागावाटप करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Other News
(Ruckus in Punjab assembly Capt Amrinder Singh opposes, Navjot Singh Sindhu slams over farm laws)