कच्छ : भारतीय नौदलाच्या नेव्हल इंटेलिजन्स आणि एनसीबीने संयुक्तपणे देशातील सर्वात मोठी छापेमारी केली आहे. या दोन्ही पथकाने अरबी समुद्रात आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्स कन्साईंटमेट पकडली आहे. नौदल आणि एनसीबीने अरबी समुद्रातून 2600 किलो ग्रॅम ड्रग्स जप्त केली आहे. देशातील ही सर्वात मोठी छापेमारी असल्याचं सांगितलं जात आहे. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा आल्याने एकच खळबळ उडाली असून या दोन्ही तपास पथकाची झोप उडाली आहे. याप्रकरणी आता कसून तपास केला जात आहे.
2600 किलो ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 12 हजार कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईराणहून एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्स आणले जात होते. गुजरातच्या बंदरावर हा माल उतरवला जाणार होता. पण त्यापूर्वीच नौदल आणि एनसीबीने हा माल जप्त करून ड्रग्स माफियांचे सर्व मनसुबे उधळून लावले आहेत. ड्रग्सच्या प्रचंड साठ्यासह पकडलेल्या ड्रग्स माफियाला कोची बंदरावर नेण्यात आलं आहे. एनसीबी आणि नौदल या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. या ड्रग्सच्या रॅकेटमध्ये कुणाकुणाचा समावेश आहे? यापूर्वी किती ड्रग्सचा साठा भारतात किती आणि कुठे आणला होता? अजूनही साठा येणार आहे काय? याचा तपास करण्यात येणार आहे.
नौदलाला ड्रग्सचा साठा येणार असल्याचे इनपूट मिळाले होते. काही ड्रग्स माफिया भारतात ड्रग्स आणणार आहेत. अरबी समुद्रातून ही तस्करी होणार आहे. कुठल्या तरी बंदरावर हे ड्रग्स उतरवले जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली होती. एवढी माहिती मिळाल्यानंतर नौदल आणि एनसीबीने संयुक्त कारवाई करत हा साठा पकडला.
नौदलाच्या INS TEG F-45 या जहाजाने अरेबियन सी एरियामएध्ये ड्रग्सचा साठा पकडला आहे. अधिकाऱ्यांनी ड्रग्स माफियांनाही अटक केली आहे. विशेष म्हणजे सूडानमधील भारतीयांना रेस्क्यू करण्यासाठी हे जहाज तैनात करण्यात आले होते. या जहाजाने भारतीयांना सुडानमधून सुरक्षित आणल्यानंतर ही कारवाई केली आहे.
यापूर्वी ही फेब्रुवारी 2022मध्ये ड्रग्सचा सर्वात मोठा साठा पकडला होता. दोन हजार कोटीच्या ड्रग्सची खेप पकडण्यात आली होती. गुजरातच्या जवळील समुद्र किनाऱ्यावर अनेकदा करोडो रुपयांची ड्रग्स पकडण्यात आलेली आहे. मात्र, सागरी मार्गाने भारतात आणलेली ही आजवरची सर्वात मोठी कन्साइनमेंट आहे. गुजरात एटीएसने राजकोटमध्ये 217 कोटीची हेरॉईन पकडली होती. सोबत एका नायजेरियन व्यक्तीलाही अटक केली होती.