आदिवासी, दुर्बल घटकांवर अन्याय करण्यात येत असल्याची ओरड करत नक्षलवाद देशातील अनेक राज्यात झपाट्याने पसरला. मिसुरडे ही न फुटलेल्या तरुणांच्या हातात बंदुका आल्या. सुरुवातीला नक्षलांच्या विचाराने अनेक तरुण-तरुणी भरकटले. पण नंतर यातील फोलपणा समोर आला. अनेकांनी बंदुका खाली ठेवल्या. अनेकांनी हा जहाल मार्ग सोडला. त्यातच गेल्या तीन दशकात भारताने झपाट्याने प्रगतीचा आलेख उंचावला आहे. त्यातच केंद्रातील मोदी सरकारने नक्षलवादी चळवळीविरोधात गेल्या काही वर्षात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. अनेक राज्यात जोरदार चकमकी झडत आहे. यापूर्वी अनेकांना शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. ज्यांनी ही संधी दवडली, त्यांचा खात्मा करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जिल्हे आता नक्षलवाद मुक्त होत आहे. पण एका वर्षात खरंच देशातील नक्षलवाद समाप्त होईल का? नक्सलबाडी गावातून सुरुवात कम्युनिस्ट विचाराच्या प्रभावाने सशस्त्र मार्गाने क्रांती करण्यासाठी काही तरुणांनी ही चळवळ सुरू केली होती. या चळवळीला सविनय, सनदशीर मार्ग मान्य नाहीत. ते शस्त्राची भाषा बोलतात. त्यांना भारतात साम्यवाद आणायचा होता....