नीट परीक्षा प्रकरणात बडे मासे सीबीआयच्या जाळ्यात येणार, CBI चा प्लॅन काय?

| Updated on: Jun 24, 2024 | 7:34 AM

NEET UG 2024: नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी एटीएसच्या पथकाने लातूरमधून दोन शिक्षकांना रविवारी ताब्यात घेतले होते. संजय जाधव आणि जलील पठाण असे या दोन शिक्षकांची नावे आहेत. चौकशी करुन त्यांना सोडून दिले होते. आता त्याच दोन शिक्षकांवर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नीट परीक्षेत गैरव्यवहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीट परीक्षा प्रकरणात बडे मासे सीबीआयच्या जाळ्यात येणार, CBI चा प्लॅन काय?
Follow us on

नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणानंतर देशभरात खळबळ माजली आहे. परीक्षेतील पेपर फूट प्रकरणात विरोधकांनीही केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. यामुळे केंद्र सरकार खळबळून जागे झाले आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आहे. तसेच राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (NTA) महासंचालक सुबोध कुमार सिंग यांची हकालपट्टी केली आहे. तपास हातात घेताच सीबीआयने या प्रकरणात जोरादार कारवाई सुरु केली आहे. सीबीआयने या प्रकरणातील बडे मासे जाळ्यात ओढण्यासाठी काम सुरु केले आहे.

चार टप्प्यात प्रकरण

सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार ते गुजरातमधील गोध्रापर्यंतच्या एफआयआरची छाननी केली. आता सीबीआय एनटीए अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एनटीएमधील अंतर्गत सुधारणा आणि परीक्षा प्रक्रियेतील सुधारणांबाबत उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. भविष्यात परीक्षा पूर्णपणे गैरव्यवहापासून मुक्त करणे आणि कायद्याच्या कठोरतेशिवाय केंद्र निवडीपासून परीक्षेच्या देखरेखीपर्यंत इतर कठोर पावले सरकारकडून उचलली जात आहे.

नीट प्रकरणाचे धागेदोरो महाराष्ट्रातही?

नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी एटीएसच्या पथकाने लातूरमधून दोन शिक्षकांना रविवारी ताब्यात घेतले होते. संजय जाधव आणि जलील पठाण असे या दोन शिक्षकांची नावे आहेत. चौकशी करुन त्यांना सोडून दिले होते. आता त्याच दोन शिक्षकांवर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नीट परीक्षेत गैरव्यवहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा एटीएसच्या बाजूने दाखल करण्यात आला आहे. लातूर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि एटीएसचे पथक शिक्षक जलील पठाण यांची चौकशी करीत अधिक माहिती मिळत होते.

हे सुद्धा वाचा

दुसरा शिक्षक फरार

एटीएसने चौकशीनंतर घरी गेलेले संजय जाधव मात्र त्यानंतर फरार झाले. ते पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. त्यामुळे लातुर पोलिसांची पथके त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागही खडबडून झाला आहे. जलील पठाण मुख्याध्यापक असलेल्या शाळेतील महत्वाचे दप्तर सील करण्यात आले आहे. आता प्रकरणाचा अतिशय गोपनियतेने तपास करण्यात येत आहे.