NEET 2021 : नीट यूजी परीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी याचिका, सुप्रीम कोर्टाचा परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय, परीक्षा कधी होणार?

| Updated on: Sep 06, 2021 | 1:29 PM

नीट परीक्षेसाठी 6 दिवस बाकी राहिले असताना सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय घेतला आहे. नीट परीक्षा लांबवीवर टाकण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती.

NEET 2021 : नीट यूजी परीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी याचिका, सुप्रीम कोर्टाचा परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय, परीक्षा कधी होणार?
नीट
Follow us on

नवी दिल्ली: राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट यूजी 2021 परीक्षा 12 सप्टेंबरला आयोजित केली जाणार आहे. नीट परीक्षेसाठी 6 दिवस बाकी राहिले असताना सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय घेतला आहे. नीट परीक्षा लांबवीवर टाकण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टानं परीक्षा लांबणीवर टाकली जाणार नाही, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे नीट यूजी परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचं प्रवेशपत्र 9 सप्टेंबर रोजी मिळणार आहे. विद्यार्थी परीक्षेपूर्वी तीन दिवस अगोदर प्रवेशपत्र एनटीएच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करु शकतात. प्रवेशपत्र जाहीर होण्यासंदर्भातील तारीख जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.

नीट यूजी परीक्षेचं प्रवेशपत्रासोबत विद्यार्थ्यांना एक स्वयंघोषणापत्र उपलब्ध होार आहे. त्या स्वयंघोषणापत्रामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी अलीकडील काळात केलेल्या प्रवासाची माहिती भरावी लागणार आहे. कोरोनाचा प्रास रोखण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून हा अर्ज भरण्यास सांगण्यात आलं आहे.

नीट यूजी प्रवेशपत्र कसं डाऊनलोड करायचं?

स्टेप 1 : सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी एनटीएची अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी
स्टेप 2 : वेबसाईटवरील प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करावं
स्टेप 3 : अर्ज क्रमांक आणि पासवर्ड दाखल करावा
स्टेप 4 : प्रवेशपत्र ओपन होईल ते डाऊनलोड करुन सोबत ठेवावं

नीट यूजी परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये

गेल्या वर्षी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत 13 सप्टेंबर रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला एकूण 13.66 लाख उमेदवार परीक्षेला बसले होते, त्यापैकी 7,71,500 विद्यार्थी पात्र ठरले होते. यावर्षी ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू आणि उर्दू या 11 भाषांमध्ये घेण्यात येणार आहे.

कोरोना नियमांचं पालन करणार

या परीक्षेबरोबरच विद्यार्थ्यांना नीट युजी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रे उपलब्ध करुन दिली जातील. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याबरोबरच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मास्क वाटप करण्यात येणार आहे. यासह विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याचा स्लॉटही ठरविला जाईल. तसेच, सर्व प्रकारच्या नोंदणी शारीरिक संपर्काशिवाय असतील. सामाजिक भेदभावाविरुद्ध संपूर्ण खबरदारी घेतली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

नीट परीक्षेमध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारनं नीट परीक्षेमध्ये अखिल भारतीय कोट्यातून ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी 27 टक्के तर आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 10 टक्के आरक्षण लागू केलं आहे. हे आरक्षण वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी लागू असेल.

तामिळनाडूमध्ये 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालयं

तामिळनाडूमध्ये एक किंवा दोन नव्हे तर 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार आहेत. ही महाविद्यालये सुरू झाल्यावर सुमारे एमबीबीएसच्या 1650 जागा वाढतील. आता नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यासाठी पंजाब, राजस्थानसह इतर राज्यांच्या यादीत तामिळनाडूचे नावही जोडले गेले आहे. तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एम सुब्रमण्यम म्हणाले की, राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने नवीन महाविद्यालयांची तपासणी सुरू केली आहे. त्याचबरोबर 11 पैकी 4 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची तपासणीही पूर्ण झाली आहे. उर्वरित महाविद्यालयांची तपासणीही पुढील काही दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

इतर बातम्या:

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं पुढचं पाऊल, ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरु होणार, वाचा सविस्तर

जमीन खरेदी विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक, परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय?