NEET पेपर लीक : टॉपरसह देशातील एकूण किती मुलं तपास यंत्रणांच्या रडारवर? हा सगळा वाद कशामुळे सुरु झाला?

| Updated on: Jun 24, 2024 | 10:44 AM

NEET Row : देशातील काही सेंटर्सवर परीक्षा उशिराने सुरु झाली. या सेंटर्सवरील मुलांनीच परीक्षा उशिराने सुरु झाल्याचे आरोप केले होते. शिक्षण मंत्रालयानुसार, जितक्या उशिराने परीक्षा सुरु झाली, तितका अतिरिक्त वेळ त्या मुलांना द्यायला पाहिजे होता.

NEET पेपर लीक : टॉपरसह देशातील एकूण किती मुलं तपास यंत्रणांच्या रडारवर? हा सगळा वाद कशामुळे सुरु झाला?
NEET Row
Follow us on

NEET यूजी परीक्षेवरुन देशभरात गोंधळ सुरु आहे. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यातून पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. देशातून एकूण 110 मुल तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 47 विद्यार्थ्यांना डीबार्ड करण्यात आलं आहे. अन्य विद्यार्थ्यांची चौकशी सुरु आहे. पेपर लीक कसा झाला? ते शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशभरातील 67 टॉपपरवर संशय आहे. या टॉपर्सना काऊन्सिलिंगमध्ये जाण्याची परवानगी असेल. तपासादरम्यान काही चुकीच केल्याच आढळून आल्यास त्यांची दावेदारी रद्द होईल. नीट यूजी परीक्षेवरुन एनटीएवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांपासून अनेक राजकीय पक्ष एनटीएवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत.

शिक्षण मंत्रालयानुसार, सर्वात मोठी चूक परीक्षेच्यावेळी झाली. देशातील काही सेंटर्सवर परीक्षा उशिराने सुरु झाली. या सेंटर्सवरील मुलांनीच परीक्षा उशिराने सुरु झाल्याचे आरोप केले होते. शिक्षण मंत्रालयानुसार, जितक्या उशिराने परीक्षा सुरु झाली, तितका अतिरिक्त वेळ त्या मुलांना द्यायला पाहिजे होता. प्रश्न तिथेच मिटला असता. शिक्षण मंत्रालयाच्या मते, सगळ्या समस्येच मूळ ग्रेस मार्कपासून सुरु झालं. परीक्षा उशिराने सुरु झाल्याने हे ग्रेस मार्क्स देण्यात आले. ग्रेस मार्कावरुन पालक कोर्टात गेले. ग्रेस मार्कांऐवजी विद्यार्थ्यांना वेळ दिला असता, तर अशी स्थिती निर्माण झाली नसती.

री टेस्टमध्ये किती विद्यार्थी सहभागी झाले?

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर रविवारी 23 जूनला री टेस्ट झाली. फक्त 52 टक्के विद्यार्थीच या री टेस्टमध्ये सहभागी झाली होती. शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनुसार, परीक्षेत केवळ 813 विद्यार्थी सहभागी झाले. 750 विद्यार्थी अनुपस्थित होते. झज्जरमध्ये 494 पैकी फक्त 287 विद्यार्थी परीक्षेसाठी गेले.