मेट्रो सर्वाधिक लोकप्रिय झालेला शहरातील वाहतुकीचा प्रकार आहे. मेट्रोमध्ये आता अनेक अद्यावत बदल होत आहे. दिल्ली मेट्रोने सर्वात मोठा बदल केला आहे. या मेट्रोमधून ड्रायव्हरचे (चालक) कॅबिनच काढण्यास सुरुवात केली आहे. मग ड्रायव्हर कुठे बसून मेट्रो चालवणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असणार…पण मेट्रो आता चालकाविना धावणार आहे. पूर्णपणे स्वंयचलित पद्धतीने मेट्रो धावणार आहे. जून महिन्याच्या शेवटपर्यंत ही स्वयंचलित मेट्रो धावणार आहे. सध्या ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेनमध्ये एक अटँडेंट असणार आहे. परंतु कालांतराने अटँडेटसुद्धा असणार आहे.
मेट्रोत ड्रायव्हरचे कॅबिन काढल्यानंतर ट्रेन पूर्ण स्वयंचलित असणार आहे. यामुळे मेट्रोच्या ट्रेनमधील प्रवाशांसाठी जास्त जागा उपलब्ध होतील. मेट्रोमध्ये ड्रायव्हरचे कॅबिन मागे अन् पुढे असे दोन्ही बाजूने असते. सध्याच्या लाईनवर धावणारी मेट्रो आणि पिंक लाईनवर धावणारी मेट्रोही ड्रायव्हरलेस असणार आहे. मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे मानवी चुका टळतात. ट्रेनचे संचालन करणे सोपे असते. दिल्ली मेट्रोनंतर हा पर्याय मुंबई अन् पुणे मेट्रोत येणार आहे.
दिल्ली मेट्रोचे पूर्ण स्वयंचलित नेटवर्क सध्या 97 किमी लांब आहे. आता या महिन्याच्या शेवटपर्यंत दिल्ली मेट्रो पूर्णपणे स्वयंचलित होणार असल्याचे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आले. 16 मेट्रोमधून ड्रायव्हरची कॅबिन काढली जाणार आहे. यामुळे प्रवाशांसाठी जास्त जागा मिळणार आहे. तसेच दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन ट्रेन अटँडेंट टप्पाटप्याने काढण्यात येणार आहे. तीन, चार ट्रेन मिळून एक अटँडेट ठेवण्यात येणार आहे.
मैजेंटा लाइन (जनकरपुरी वेस्ट ते बॉटेनिकल गार्डन) वर ड्रायव्हरलेस मेट्रो डिसेंबर 2020 मध्ये सुरु झाली. नोव्हेंबर 2021 मध्ये पिंक लाईनवर ड्रायव्हरलेस मेट्रो सुरु झाली. जेव्हा ड्रायव्हरलेस ऑपरेशन सुरू झाले तेव्हा मेट्रो ट्रेनवर एक अटँडेंट होता. आपत्कालीन परिस्थिती मेट्रो ट्रेन सांभाळण्यासाठी ही नियुक्ती केली गेली.