बातमी तुमच्या कामाची: देशात लवकरच सुरु होणार ई पासपोर्ट, पोलीस व्हेरिफिकेशनसाठीही जास्त वेळ लागणार नाही, परराष्ट्रमंत्र्यांची काय घोषणा?

| Updated on: Jun 24, 2022 | 10:47 PM

२४ जून म्हणजे शुक्रवारी पासपोर्ट दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी बोलताना परराष्ट्रमंत्री म्हणाले की, परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या अनुभवात नक्कीच बदल होईल. कोरोना काळतही ही सुविधा तेवढीच उत्साहाने काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

बातमी तुमच्या कामाची: देशात लवकरच सुरु होणार ई पासपोर्ट, पोलीस व्हेरिफिकेशनसाठीही जास्त वेळ लागणार नाही, परराष्ट्रमंत्र्यांची काय घोषणा?
S jayshankaran
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली – देशात लवकरच ई पासपोर्ट (E passport)सेवा सुरु होणार आहे, परराष्ट्रमंत्री एस जयशंकरन (S Jayshankaran)यांनी अशी घोषणा केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास (international travel)हा सोपा आणि सुरळीत होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रक्रियेमुळे भारतीय म्हणून खोटी ओळख दाखवणाऱ्यांवरही गदा येणार आहे. नागरिकांचा चांगला प्रवास आणि त्या आधीची प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे परराष्ट्रमंत्री एकस जयशंकर यांनी सांगितले आहे. 24जून म्हणजे शुक्रवारी पासपोर्ट दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी बोलताना परराष्ट्रमंत्री म्हणाले की, परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या अनुभवात नक्कीच बदल होईल. कोरोना काळतही ही सुविधा तेवढीच उत्साहाने काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

नागरिकांना चांगली पासपोर्ट सुविधा मिळणार

येत्या वर्षभरात नवीन डिजिटल इकोसिस्टिम निश्चित करण्यात येणार असल्याची माहितीही जयशंकर यांनी दिली आहे. गेल्आ महिन्या भरात सुमारे साडे तेरा लाख पासपोर्टच्या परवानगीचे अर्ज आले होते, अशी माहितीही देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

पोलीस व्हेरिफिकेशनसाठीही कमी काळ लागणार

पासपोर्ट देण्याची पद्धती अधिक सुलवभ व्हावी, यासाठी स्थनिक पातळीवर करण्यात येत असलेल्या पोलीस व्हेरिफिकशेनच्या लागणाऱ्या वेळातला विलंब करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे जयशंकर यांनी सांगितले आहे. पासपोर्ट पोलीस व्हेरिफिकेशनसाठी साधारण 22cराज्यांतील 8275पोलीस स्टेशनांचा विनियोग करण्यात येतो.मात्र आता ही प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा सरकारचा विचार सुरु आहे. प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी 428पोस्ट ऑफिसच्या सर्व्हिस सेटंरशी चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आत्तापर्यंत 178राजदूत असलेल्या देशांतील पासपोर्ट प्रक्रियेचे एकत्रीकरण केलेले आहे. यामुळे मध्यवर्ती यंत्रणा उभी राहिली असून, एनआरआय भारतीय प्रवाशांना पासपोर्टच्या सुविधेबाबत थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.