श्रीनगरः राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जम्मू-काश्मीर पोलिसांसह बुधवारी काश्मीरमध्ये 11 ठिकाणी छापे टाकले. आजच्या कारवाईत श्रीनगर, बारामूला, पुलवामा, अवंतीपोरा, सोपोर, गंदरबल, बडगाम, बांदीपोरा, पुलगाम आणि शोपियामध्ये छापे टाकण्यात आल्या. जम्मू-काश्मीरमध्ये मध्यंतरी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, प्रतिबंधित संघटनेच्या जमात-ए-इस्लामी (JeI) विरोधात ही कारवाई करण्यात आली. या दहशतवादी संघटने दहशतवादी कृत्त्यांसाठी पैसे पुरवणेयाचा आरोप आहे. 10 ऑक्टोबरला पण एनआईए ने 16 ठिकाणी छापेमारी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार पुलगाम, बारामुला, श्रीनगर यी ठिकाणी दहशतवाद विरोधात कारवाई केली होती. (NIA Jammu & Kashmir Raids against Jamait e islam terror attacks)
देवसर येथील मोहम्मद अखराम बाबाचे घर आणि बाबापोरा येथील शबाना शाह यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. मोहम्मद अखराम (६९) हा देवसर येथील रहिवासी आसून निवृत्त सरकारी कर्मचारी आहे. त्या जमात-ए-इस्लामी संबंधित असल्याचा म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘व्हॉईस ऑफ हिंद’ मासिकाच्या प्रकाशना संबंधीत (ज्याचा उद्देश तरुणांना भडकावणे आणि कट्टरपंथी बनवणे आहे) ही कारवाई करण्यात आली. टीआरएफ (द रेझिस्टन्स) कमांडर सज्जाद गुल यांच्या घरावरही छापा टाकण्येत आला.
पुंछ जिल्ह्यातील जंगलांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून दहशतवादी दबा धरुन बसल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्यानं प्रसिद्ध झाल्या आहेत. दहशतवाद्यांचे विविध गट जंगलात कार्यरत असल्याची माहिती आहे. पुंछ राजौरी भागात ऑगस्ट महिन्यापासून एन्काऊंटर्स सुरु आहेत. 6 ऑगस्टला दोन दहशतवाद्यांचा, तर, 13 सप्टेंबरला एका दहशतवाद्याचा खात्मा कण्यात आला होता.
दहशतवाद्यांनी 11 ऑक्टोबरच्या रात्री हल्ला केला तेव्हा भारताचे पाच जवान शहीद झाले होते. त्यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश होता. तर, 14 ऑक्टोबरला दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आणखी चार जवानांना वीरमरण आलं होतं त्यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश होता.
इतर बातम्या
NIA Jammu & Kashmir Raids against Jamait e Islam terror attacks