नवी दिल्ली- भारतीय नागरिकांच्या वाढत्या स्थूलतेबाबत केंद्र सरकार चिंतेत आहे. केंद्र सरकारचा थिंक टँक नीति आयोगानं (Niti Aayog) वाढत्या स्थूलतेबाबत (Fatness) चिंता व्यक्त केली आहे. देशातील नागरिकांची स्थूलता नियंत्रण करण्यासाठी केंद्र शुगर, फॅट आणि सॉल्टी फूड प्रॉडक्ट्स वर (taxation of foods high on sugar, fat and salt) टॅक्स लावण्याच्या विचारात आहेत. स्थूलतेत वाढ करणाऱ्या उत्पादनांवर कर आकारणीसोबतच त्यांच्यावर स्थूलतेस हानिकारक असल्याचे लेबल लावण्याच्या देखील विचार करत आहे. नीती आयोगाच्या वर्ष 2021-22 च्या अहवालात भारतीय नागरिकांत वाढत्या स्थूलतेवर मात करण्यासाठी कर आकारणी, लेबलिंग पर्यायांचा विचार सुरू असल्याचे मत व्यक्त करण्यात आलं आहे. लहान मुले, किशोर वयीन तरुण व महिलांमध्ये झपाट्याने वजन वाढ दिसून येत आहे. 24 जून 2021 ला नीती आयगोनं समस्येवर विचारमंथन करण्यासाठी राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजनं केलं होतं.
नीती आयोग आर्थिक विकास संस्था ( IEG) आणि भारतीय सार्वजनिक आरोग्य संघटना (PHFI) यांच्या सहयोगानं स्थूलतेवर काम करत आहे. नीती आयोग मिशन फिटनेससाठी उपलब्ध सर्व पर्यायांचा विचार करत असल्याचं दिसून येतं आहे. यामध्ये उत्पादनांवर लेबलिंग, शुगर-मीठ अधिक प्रमाण असलेल्या उत्पादनांवर कर समाविष्ट आहे.
पुरुषांपेक्षा महिला स्थूल:
सध्या व्हेजिटबल चिप्स किंवा तत्सम स्नॅक्स पदार्थांवर 12 टक्के जीएसटीची आकारणी केली जाते. राष्ट्रीय कुटूंब आरोग्य सर्वेक्षणानुसार (एनएफएचएस-5) 2019-20 मध्ये स्थूलतेनं ग्रस्त महिलांची संख्या 24 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर वर्ष 2015-16 मध्ये प्रमाण 20.6 टक्के होते. पुरुषांमध्ये स्थूलतेचे प्रमाण महिलांच्या तुलनेत कमी आहे. मात्र, पुरुषांमध्येही स्थूलतेचे प्रमाण 18.4 टक्क्यांनी वाढून 22.9 टक्क्यांवर पोहोचले आहे.
नीती आयोगाचं हायपरलूप धोरण
नीती आयोगाच्या वार्षिक अहवालात हायपरलूप विषयी भाष्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकार हायपरलूप धोरणांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील असल्याचं नीती आयोगानं म्हटलं आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष व्ही.के.सारस्वत यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या आतापर्यंत चार बैठका पूर्ण झाल्या आहेत.
स्थूलता शहरी ते ग्रामीण:
स्थूलता म्हणजे लठ्ठपणा किंवा वजन जास्त असणे. साधारणपणे यात शरीरातील चरबीचे प्रमाण जास्त असते. जगभर ही एक वाढती समस्या आहे. भारतातही शहरी विभागात याचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी हा आजार प्रौढांमध्ये जास्त होता. आता मात्र लहान मुले, तरुण आणि वृध्द या सगळयांमध्येच त्याचे प्रमाण वाढत आहे.
Niti Aayog discuss impose tax on high sugar fat and salt to tackle rising obesity