सभा सुरू असताना अचानक नितीन गडकरी यांना चक्कर आली; कार्यक्रम थांबवला

| Updated on: Nov 17, 2022 | 3:28 PM

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची अचानक तब्येत बिघडली आहे. येथील एका सभेला संबोधित करताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला.

सभा सुरू असताना अचानक नितीन गडकरी यांना चक्कर आली; कार्यक्रम थांबवला
सभा सुरू असताना अचानक नितीन गडकरी यांना चक्कर आली; कार्यक्रम थांबवला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोलकाता: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची अचानक तब्येत बिघडली आहे. येथील एका सभेला संबोधित करताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला. यापूर्वीही दोनदा नितीन गडकरी यांना सभांमध्ये भाषण करत असताना चक्कर आली होती. त्यावेळीही कार्यक्रम थांबवावे लागले होते. दरम्यान, गडकरी यांची प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं जात आहे.

नितीन गडकरी हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. परिवहन आणि राष्ट्रीय राजमार्गाच्या कार्यक्रमालाच्या कार्यक्रमासाठी ते सिलीगुडीला आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 चे भूमिपूजन करण्यात आले. 1206 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने सिलीगुडी येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नितीन गडकरी बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी भाषणाला सुरूवातही केली. भाषण सुरू असतानाच अचानक त्यांना गरगरल्या सारखं झालं. त्यामुळे त्यांनी तात्काळ भाषण थांबवलं आणि खुर्चीवर जाऊन बसले.

त्यांची तब्येत बिघडल्याचं लक्षात आल्याने स्टेजवरील नेत्यांनी त्यांना प्यायला पाणी दिलं. थोडावेळ बसल्यानंतर त्यांना बरं वाटू लागल्याचं सांगण्यात आलं. नितीन गडकरी यांची प्रकृती चांगली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

यापूर्वीही नितीन गडकरी यांना दोनदा कार्यक्रम सुरू असताना चक्कर आली होती. मागच्यावेळी गडकरी शिर्डीत आले होते. यावेळी सभेला संबोधित करत असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे त्यांना तात्काळ खुर्चीवर बसवण्यात आलं होतं. तसेच त्यांना लिंबू पाणी देण्यात आलं होतं.