नितीन गडकरी यांचा मास्टर स्‍ट्रोक, 1,200 कोटी रुपये वाचवले, काय वापरला फंडा?

| Updated on: Jan 07, 2025 | 11:24 AM

Nitin Gadkari: एनएचएआयवर 3.35 लाख कोटी रुपये कर्ज होते. 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत ते कर्ज 2.76 लाख कोटी रुपयांवर आले आहे. एनएचएआय आपले कर्ज कमी करण्यात यशस्वी ठरली आहे.

नितीन गडकरी यांचा मास्टर स्‍ट्रोक, 1,200 कोटी रुपये वाचवले, काय वापरला फंडा?
Nitin Gadkari
Follow us on

Nitin Gadkari: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. वेगळा विचार करुन प्रकल्प राबवत असतात. नितीन गडकरी यांना आता मास्टर स्ट्रोक मारला आहे. त्यांनी उचललेल्या पावलामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) मोठा फायदा झाला आहे. ‘नही’चे एका झटक्यात 1,200 कोटी रुपये वाचले आहेत. हे पैसे कर्जाची आगावू परतफेड केल्यामुळे वाचले आहेत. त्याचा फायदा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी होणार आहे.

कर्ज झाले कमी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चालू आर्थिक वर्षात 56,000 कोटी रुपयांचे कर्ज मुदतीपूर्वी फेडले आहे. त्यामुळे नहीचे 1,200 कोटी रुपयांचे व्याज वाचले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितनुसार, एनएचएआयवर 3.35 लाख कोटी रुपये कर्ज होते. 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत ते कर्ज 2.76 लाख कोटी रुपयांवर आले आहे. एनएचएआय आपले कर्ज कमी करण्यात यशस्वी ठरली आहे.

कर्ज मुदतीपूर्वी देण्याच्या प्रक्रियेस प्रीपे म्हटले जाते. उदाहरण तुम्ही एखाद्या कारासाठी पाच वर्षाचे कर्ज घेतले. परंतु कर्ज तीन वर्षातच फेडले तर त्याला प्रीपेमेंट म्हणतात. त्यामुळे व्याजाच्या रक्कमेत मोठी बचत होते. एनएचएआयला इन्फ्रॉस्ट्रचर इनव्हेसमेंट फंडाकडून मिळालेले 15,700 कोटी रुपये कर्जाच्या मुदतपूर्वी परतफेडीसाठी वापरले आहे. तसेच राष्ट्रीय लघू बचत निधी 30,000 कोटी रुपये, भारतीय स्टेट बँकेचे 10,000 कोटी असे 40,000 कोटी रुपयाचे कर्ज फेडले आहे.

हे सुद्धा वाचा

असा होणार फायदा

नहीचे कर्ज कमी होत असल्यामुळे या संस्थेची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. कर्ज कमी होत असल्यामुळे व्याजावर होणारा खर्च कमी होणार आहे. हा वाचलेला खर्च नवीन राष्ट्रीय महामार्ग निर्मिती करण्यासाठी वापरता येणार आहे. इन्फ्रॉस्ट्रक्चर इनव्हेसमेंट फंड एक गुंतवणूक ट्रस्ट आहे. त्याकडून नहीला निधी मिळाला आहे. त्यामुळे जास्त व्याज देण्यापासून या संस्थेची सुटका झाली आहे. सरकारला नहीची आर्थिक परिस्थिती मजबूत करायची आहे. त्यामुळे देशातील पायाभूत सुविधा वाढणार आहे. नवीन महामार्ग झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.