केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या कामांमुळे देशभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मंत्रालयाने देशभरात काँक्रिटच्या रस्त्याचे जाळे पसरवण्याच्या कामाचा धडाका लावला आहे. नितीन गडकरी हे नेहमी भविष्याचा विचार करुन काम करणारे मंत्री आहेत. त्यांच्या अनेक भाषणांमध्ये देखील ते नेहमीच कामाबद्दल बोलत असतात. नवी आव्हाने आणि त्याच्यावर काय केले पाहिजे याबाबत ते बोलत असतात. नितीन गडकरी यांनी आता ग्रीन हायड्रोजन इंधनावर रस्त्यावर गाड्या चालतील असे म्हटले आहे. भारतात ग्रीन हायड्रोजनचा वापर वाढवण्याच्या योजनेवर ते भर देत आहेत. त्यामुळेच त्यांनी लोकांना एक सल्ला दिलाय की, हिऱ्यांऐवजी आता कचऱ्यावर काम करा. मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या विशेष संपर्क अभियानादरम्यान त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की – भारताच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे झाली, आज देशातील परिस्थिती अशी आहे की, कम्युनिस्ट विचारधारा, कम्युनिस्ट पक्ष संपण्याच्या जवळ आहे किंवा रशियामध्येही कम्युनिस्ट पक्षाने आपले विचार बदलले आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना ते एका दुकानात टीव्ही घेण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी त्यांनी टीव्ही हा इन्स्टॉलेशनमध्ये हवा असल्याचे सांगितले. पण जेव्हा दुकानदाराला कळाले की मी मंत्री आहे. त्याने लगेचच सांगितले की गहा चांगला पीस नाही. चांगला पीस आला की तुम्हाला देतो. पण तो दिवस कधी आलाच नाही. कारण मंत्र्याला हप्त्यावर टीव्ही दिल्यानंतर त्याला पैसे मिळतील की नाही याची शंका होती. टीव्ही आला नाही, पण मनात एक कल्पना नक्कीच आली की जेव्हा टीव्ही, फ्लॅट आणि फ्रीज हप्त्यावर येऊ शकतात, तर रस्ता, पूल, बोगदा का नाही? मग त्यावर उदारमतवादी धोरण केले. भाजप सरकारने हे उदारमतवादी अर्थशास्त्र स्वीकारले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की, मथुरेत एक प्रकल्प यशस्वी झालाय. ज्यामध्ये दूषित पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे. जे द्रव आधारित व्यवस्थापन प्रकल्पात यशस्वी झाले. यासोबतच त्यांनी लोकांना हिऱ्यांऐवजी कचरा वापरण्याचा सल्ला दिला. कचरा खूप महत्वाचा असतो. जर तुम्ही कचरा वेगळा केला तर त्यात प्लास्टिक, काच, ॲल्युमिनियम असतो. या सर्वांना पुनर्वापर केला जाऊ शकतो. कचऱ्यापासून तयार होणाऱ्या हायड्रोजनवर पुढे सर्व वाहने चालतील.