मुंबई: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दिल्ली-मुंबई ग्रीन एक्स्प्रेस वेच्या कामाची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांचा दौरा सुरु झाला आहे. नितीन गडकरी यांनी हरियाणा आणि राजस्थानमधील कामाची पाहणी केली. नितीन गडकरींनी सकाळी हरियाणामध्ये पाहणी केल्यानंतर राजस्थानमध्ये महामार्गाच्याकामाची हवाई पाहणी केली. या प्रकल्पामुळं दिल्ली ते मुंबई हे अंतर 12 तासात पूर्ण करता येणार आहे. हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतून महामार्ग जाईल. दिल्ली- मुंबई ग्रीन एक्स्प्रेस वे 1380 किलोमीटरचा आहे. असं गडकरी म्हणाले
देशाची राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या ग्रीन एक्स्प्रेस वेच्या कामाची पाहणी नितीन गडकरी यांच्याकडून केली जातेय. हा महामार्ग 1 लाख कोटी रुपये खर्च करुन पूर्ण केला जातोय. या महामार्गाचं काम 2023 पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. या महामार्गाचं काम तीन राज्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात काही ठिकाणी काम थांबलं होत. मात्र, आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम महामार्गाचं करण्यात येत आहे.
दिल्ली ते मुंबई हा 1380 कि.मीचा एक्स्प्रेस वे हा देशातील सर्वात लांबीचा एक्स्प्रेस वे असेल. या महामार्गामुळं दिल्ली ते मुंबई अंतर 130 किलोमीटरनं कमी होईल. तर, नवी दिल्ली ते मुंबई यामार्गात येणाऱ्या शहरांना जोडलं जाईल. दिल्ली, फरिदाबाद, सोहना, जयपूर शहरांना जोडलं जाईल.
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे के दो दिवसीय निरीक्षण कार्यक्रम के अपने दूसरे पड़ाव में राजस्थान के दौसा में कार्य के प्रगति का निरीक्षण किया। #PragatiKaHighway #DelhiMumbaiExpressway pic.twitter.com/iD0qReIG2I
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 16, 2021
दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वे वरील दोन टप्पे दिल्ली-दौसा- लस्लोट हा भाग दिल्ली जयपूर एक्स्प्रेस वेचा बाग आहे आणि वडोदरा आणि अंकलेश्वर हे दोन टप्पे मार्च 2022 पर्यंत सुरु करण्यात येणार आहेत. तर, संपूर्ण एक्स्प्रेस वे मार्च 2023 पर्यंत सुरु करण्यात येईल. 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांनी या कामाचा शुभारंभ केला होता. 1380 किलोमीटर पैकी 1200 किमीच्या काम ठेकेदारांना देण्यात आलं आहे. त्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
8 पदरी लेन
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे हा एकूण 8 लेन चा असेल. त्यातील 4 लेनचं काम अगोदर पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील 4 लेन बनवल्या जातील, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. दिल्ली ते दौसा 220 किमीचं काम मार्च 2022 पर्ण होईल, असं नितीन गडकरी म्हणाले. हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 5 राज्यांतून एक्स्प्रेस वे जाईल. दिल्ली गुरुग्राम मेवात कोटा रतलाम गोदरा वडोदरा सुरत दहिसर मार्गे मुंबईत दाखल होईल.
इतर बातम्या:
महामारीच्या काळातही केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, 14 लाख कोटींच्या कर्जाचे वितरण
Nitin Gadkari take review of work of Delhi Mumbai Express way in Haryana and Rajasthan