नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशा चर्चांनी जोरही धरला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीच खुलासा केला आहे. अशी स्वप्नं पडणं हा आजार आहे. असे काही होणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष चालेल, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. (no new equation in maharashtra with bjp, says sanjay raut)
संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. त्याविषयी मी त्यांच्याशी संवाद साधला. पण तुम्हाला वाटतं तसे राजकारण यात नाही, असं राऊत म्हणाले.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पवारांच्या आशीर्वादाने सरकार चालू असल्याचं विधान केलं आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार हे वयाने, अनुभवाने मोठे नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद सरकारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ते मान्य केलं आहे. अमोल कोल्हे राणा भीमदेवी थाटात बोलले असतील. पण हे तीन पक्षांचे सरकार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नाशिकमध्ये भेटले. त्यामुळे मनसे आणि भाजप एकत्र येण्याची चिन्हे आहेत. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. अशी समीकरणे राजकारणात होत असतात. पण महापालिकेवरील शिवसेनेचा झेंडा खाली उतरणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले तर उत्तर प्रदेश सोडून जाऊ, असा इशारा दिला आहे. त्यावरही राऊत म्हणाले, या देशात राज्यकर्त्यांशी मतभेद असू शकतात. राज्यकर्त्यांशी मतभेद असले तरी देशात कुणाला असुरक्षित वाटू नये.
उद्या सोमवारी लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक झाली. देशातील महागाई, कोव्हिड, पेट्रोल दरवाढ, लडाखमध्ये चीनची घुसखोरी आदी विषयांवर पावसाळी अधिवेशनात चर्चा व्हावी अशी मागणी विरोधी पक्ष करणार आहे. या बैठकीत ओबीसी, मराठा आरक्षणाचा मुद्दा पंतप्रधानांसमोर उपस्थित करून त्यांना ठोस निर्णय घ्यायला सांगू, असंही ते म्हणाले. (no new equation in maharashtra with bjp, says sanjay raut)
BREAKING : मुंबईत पावसाचा हाहाकार, चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 11 जणांचा मृत्यूhttps://t.co/Tz58aAi5l0 #Mumbai #MumbaiRains #Chembur #Landslides
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 18, 2021
केवळ राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवरच पंतप्रधानांशी चर्चा झाली; शरद पवार यांचा खुलासा
VIDEO: अखेर वेळा जुळल्या, राज ठाकरे-चंद्रकांतदादांची 15 मिनिटं खलबतं; चंद्रकांत पाटील म्हणतात…
(no new equation in maharashtra with bjp, says sanjay raut)