नवी दिल्ली, दि. 8 फेब्रुवारी 2024 | नास्त्रेदमस यांच्या भविष्यासंदर्भात अनेकांना माहीत आहे. परंतु एथोस सॅलोमे (Athos Salomé) हे ही ‘जिंदा नास्त्रेदमस’ नावाने ओळखले जाऊ लागले आहेत. त्यांची भविष्यवाणी सध्या चांगली चर्चेत आली आहे. ब्राझीलमधील रहिवाशी असलेले 37 वर्षीय ‘जिंदा नास्त्रेदमस’ यांचे अनेक भविष्य सत्य ठरले आहेत. महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूसंदर्भात ‘जिंदा नास्त्रेदमस’ यांनी भविष्य वर्तवले होते. एलन मस्कचे यांच्या ट्विटरबाबत त्यांनी भविष्य वर्तवले होते, ते सत्य ठरले. आता त्यांनी 2024 संदर्भात धक्कादायक भविष्य वर्तवले आहे. त्यात त्यांनी चीन आणि रुसमध्ये तिसरे महायुद्ध होणार असल्याचे सांगितले.
‘जिंदा नास्त्रेदमस’ यांच्या मतानुसार 2024 मध्ये अमेरिकेसमोर अनेक संकटे असणार आहेत. पाणी आणि आग ही मुख्य संकट जगातील सुपर पॉवर असलेल्या अमेरिकेसमोर असणार आहे. किंग चार्ल्स यांच्या आजारपणाबाबत काहीही धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे. त्यांना आपल्या प्रकृतीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागणार आहे. ‘जिंदा नास्त्रेदमस’ यांनी 2024 हे वर्ष परिवर्तनाचे वर्ष असणार आहे, असे म्हटले आहे. यावर्षभरात एआय म्हणजेच अर्टीफिशियल इन्टेलिजेन्समध्ये वेगाने बदल होणार असल्याचे म्हटले आहे.
जग गेल्या अनेक शतकांपासून एलियन्सशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. या पृथ्वीच्या पलीकडे जीवसृष्टी असल्याची कल्पना अनेक शास्त्राज्ञांची आहे. त्यामुळे एलियन्सशी संपर्क करण्यासाठी प्रयोग सुरुच असतात. ‘जिंदा नास्त्रेदमस’ यांनी या वर्षी एलियन्ससोबत संपर्क होणार असल्याचे म्हटले आहे. परंतु हे एक मोठे आक्रमण असणार आहे. मानव आणि एलियन्समध्ये दुर्बिणींच्या माध्यमातून संपर्क होणार आहे.
‘जिंदा नास्त्रेदमस’ ने म्हटले की, एका मोठ्या सायबर हल्ल्यामुळे तिसऱ्या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. रूस आणि चीन दरम्यान तिसरे युद्ध होण्याचा धोका आहे. भारतासंदर्भात भविष्यवाणी करताना जिंदा नास्त्रेदमस म्हटले आहे की, 2024 मध्ये भारत उल्लेखनीय प्रगती करणार आहे. त्यांनी भारताला जगाचा वाघ (टायगर) म्हटले आहे.