पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानाआधी आम आदमी पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. पंजाबचे संसदीय कामकाज मंत्री बलकार सिंह यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर भाजप नेते तजिंदर पाल बग्गा यांनी आरोप केला आहे की, एक मुलगी बलकार सिंह यांच्याकडे जाब विचारण्यासाठी गेली असतान त्यांनी तिला कपडे काढण्यास भाग पाडले आणि व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्य केले. त्यामुळे बलकार सिंह यांना बडतर्फ करावे अशी मागणी भाजपने केली आहे. मंत्री बलकार सिंह यांनी आरोपांवर म्हटले की, त्यांना याबाबत काहीही माहिती नाही.
पंजाबमध्ये शेवटच्या टप्प्यात म्हणजेच १ जूनला मतदान होणार आहे. पण त्याआधीच पंजाबचे मंत्री बलकार सिंह यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी आरोप केलाय की, बलकार यांनी तिला व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. त्यानंतर तिला कपडे काढण्यास भाग पाडले. मी भगवंत मान यांना बलकर यांना ताबडतोब बडतर्फ करण्याची मागणी करतो.” पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनीही बलकार सिंह यांच्या कथित अश्लील व्हायरल व्हिडिओवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले आहेत की, मला त्यांना विचारायचे आहे की ते संपूर्ण पंजाबला बदनाम करण्याचा प्रयत्न का करत आहेत? ही आमची सभ्यता नाही. ‘आप’ने जाणीवपूर्वक अशा लोकांना सत्तेत बसवले आहे.
“National Commission for Women is gravely disturbed by a Twitter post allegations against Punjab MLA Mr. Balkar Singh. The reported acts, if substantiated, constitute serious violations under IPC sections 354 and 354B, directly affronting a woman’s dignity,” tweets National… pic.twitter.com/5MSuauWg6t
— ANI (@ANI) May 27, 2024
राष्ट्रीय महिला आयोगाने पंजाबचे आमदार बलकार सिंह यांच्यावरील आरोपांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणाची जलद आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. NCW ने अध्यक्ष रेखा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली कथित वर्तनाचा तीव्र निषेध केला आहे. एनसीडब्ल्यूने ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, रेखा शर्मा यांनी या प्रकरणाचा वेगवान आणि निष्पक्ष तपास सुनिश्चित करण्यासाठी पंजाब पोलीस महासंचालक (डीजीपी) यांना त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले की, पंजाबचे आमदार बलकार सिंह यांच्यावर अनुचित वर्तनाचा आरोप आहे.