नवी दिल्ली: 7 ऑक्टोबर, ती तारीख ज्या दिवशी नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर त्यानी कधीही मागे वळून पाहिलं नाही. यंदाच्या 7 ऑक्टोबरला मोदी घटनात्मक पदावर बसण्याच्या घटनेला 20 वर्ष पूर्ण होत आहे. याचनिमित्ताने पंतप्रधान मोदी देवभूमी उत्तराखंडला भेट देणार आहे. केदारनाथ चरणी पंतप्रधान मोदी लीन होऊन महादेवाचा आशीर्वाद घेणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, मोदी 7 ऑक्टोबरला उत्तराखंडच्या जॉली ग्रांड विमानतळाचं उद्घाटन करतील, याशिवाय ऋषिकेश इथल्या एम्स रुग्णालयातल्या ऑक्सिजन प्लांटचंही ते उद्घाटन करणार आहेत. ( October 7 Prime Minister Narendra Modi’s visit to Devbhoomi Uttarakhand, October 7 is an important date for Modi )
मोदींसाठी केदारनाथ किती महत्त्वाचं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अकराव्या ज्योतिर्लिंग केदारनाथ धामवर प्रचंड विश्वास आहे. 80 च्या दशकात नरेंद्र मोदींनी केदारनाथमधील मंदाकिनी नदीच्या डाव्या बाजूला असलेल्या गरुडचट्टी इथं दीड महिना ध्यान केल्याचं सांगितलं जातं. त्यावेळी ते दररोज बाबांच्या दर्शनासाठी केदारनाथ मंदिरात पोहोचत. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी 3 मे 2017 रोजी पहिल्यांदा केदारनाथला गेले. स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी त्यांच्या कार्यकाळात चार वेळा केदारनाथ यात्रा केली. यापूर्वी इंदिरा गांधी पंतप्रधान म्हणून दोनदा केदारनाथच्या दर्शनाला पोहोचल्या होत्या.
पंतप्रधान मोदींचे आधीचे 4 केदारनाथ दौरे
सगळ्यात पहिल्यांदा 3 मे 2017 मोदी केदारनाथला पोहचले होते, त्यानंतर त्याच वर्षी 20 ऑक्टोबर 2017 मोदींनी पुन्हा केदारनाथ दौरा केला. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 7 नोव्हेंबर 2018 लाही मोदींनी भोलेबाबाचं दर्शन घेतलं, तर 18 मे 2019 लाही मोदी केदारनाथच्या दर्शनाला पोहचले होते. दरम्यान, मागील वर्षी कोरोना लॉकडाऊनमुळे मोदींना केदारनाथला जाता आलं नाही, मात्र आता कोरोना लॉकडाऊन हटल्यानतर आणि कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर ते पुन्हा एकदा भोलेबाबाच्या दर्शनाला निघाले आहेत.
मोदींसाठी 7 ऑक्टोबरचं महत्त्व
7 ऑक्टोबर 2001 रोजी नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा प्रवास त्यांनी यशस्वीपणे केला, हे करताना त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले. सर्वात जास्त दिवस पंतप्रधानपद भूषवणारे ते पहिले बिगर काँग्रेस नेते आहेत. त्यांच्या आधी हा विक्रम अटलबिहारी वाजपेयींच्या नावावर होता. 7 ऑक्टोबर 2001 रोजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि ते सलग 4 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री राहिले.
7 ऑक्टोबरला मोदी भोलेबाबा चरणी
मोदींनी 22 मे 2014 पर्यंत सलग 12 वर्षे 227 दिवस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले, जो गुजरातमधील एका मुख्यमंत्र्यासाठी सर्वात मोठा कार्यकाळ आहे. संवैधानिक पदांवर 20 वर्षे काम करणाऱ्या मोदींनी उत्तराखंडला भेट देण्यासाठी हा ऐतिहासिक दिवस निवडला आहे, त्यामुळे त्यांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास आणि महत्त्वाच्या भूमिकांचीही यावेळी चर्चा होत आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा प्रवास
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. 2001 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्र स्वीकारली, आणि त्याच वर्षी भुजमध्ये भयंकर भूकंप आला. हा गुजरातला मोठा फटका होता. भूकंपातून गुजरातला पुन्हा उभं करण्यासाठी मोदींच्या ‘व्हायब्रंट गुजरात’ कार्यक्रम महत्त्वाचा ठरला. यानंतर गुजरात वीजनिर्मितीसह अनेक आघाड्यांवर स्वयंपूर्ण राज्य तयार झालं. गुजरातमध्ये विकासाची अशी गंगा वाहू लागली, ज्याची देशभर चर्चा झाली. त्यानंतर मोदी ब्रांड तयार झाला, नंतर भाजपाने मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केलं. मोदी लाटेत कधी नव्हे तेवढं यश भाजपला मिळालं आणि तेव्हापासूनच भाजप देशात बहुमतात सत्तेत आलं.
हेही वाचा: