नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर जमियत उलेमा-ए-हिंदच्या अधिवेशनात रविवारी चांगलाच गोंधळ झाला. मौलाना अर्शद मदनी यांनी मोहन भागवत यांच्यावर टीका केली. परंतु ते येथेच थांबले नाही पुढे जाऊन त्यांनी अल्लाह आणि ओम एक असल्याचे म्हटले. जैन गुरु लोकेश मुनी यांनी यावर आक्षेप घेतला. जैन गुरू लोकेश मुनी यांनी मंचावर उभे राहून निषेध व्यक्त केला आणि म्हणाले की सर्वांना जोडण्याच्या या कार्यक्रमात आक्षेपार्ह गोष्टी का? त्यानंतर त्यांच्यांसह सर्वच धर्मगुरूंनी मंच सोडला.
#WATCH मैंने धर्म गुरु से पूछा जब कोई नहीं था,न श्री राम,न ब्रह्म,तब मनु किसे पूजते थे?कुछ लोग बताते हैं कि वे ओम को पूजते थे तब मैंने कहा कि इन्हें ही तो हम अल्लाह,आप ईश्वर,फारसी बोलने वाले खुदा और अंग्रेजी बोलने वाले गॉड कहते हैं: जमीयत उलेमा-ए-हिंद प्रमुख मौलाना सैयद अरशद मदनी pic.twitter.com/TxiKNjVhMk
हे सुद्धा वाचा— ANI_HindiNews (@AHindinews) February 12, 2023
मौलाना मदनी म्हणाले की, मी मोठ मोठ्या धर्मगुरुंना विचारले की, जेव्हा श्रीराम, ब्रह्मा,शिव… कोणीही नव्हते, तेव्हा मनू कुणाची पूजा करत होता? कुणी म्हणाले, महादेवाची पूजा करत होता. तर काही जण मनुने ओमची पूजा केल्याचा दावा करतात. ओम कोण आहे? अनेकांनी सांगितले की, ओम एक हवा असल्याचे अनेक जण सांगतात. त्याला कोणतेही रूप किंवा रंग नाही. तो जगात सर्वत्र आहेत. अरे बाबा, याला आपण अल्लाह म्हणतो. तुम्ही त्याला देव म्हणता.
जैन मुनींची हरकत
मौलाना मदनी यांच्या विधानावर जैन मुनी लोकेश यांनी तीव्र हरकत नोंदवली. ते म्हणाले की, हे अधिवेशन माणसे जोडण्यासाठी आयोजित केले आहे. त्यामुळे अशा विधानाचे कोणतेही औचित्य नाही, असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी कार्यक्रम स्थळ सोडले. त्यांच्यानंतर अन्यही काही धार्मिक संतांनी या कार्यक्रमातून काढता पाय घेतला. ख्रिश्चन लोक गॉड म्हणतात.
भाजप अन् संघ
जमियत उलेमा-ए-हिंदच्या 34 व्या अधिवेशनात मौलाना अर्शद मदनी यांनी म्हटले की, भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसशी आमचे शत्रुत्व नाही, पण धर्माच्या आधारावर भेदभाव होता कामा नये. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. RSS संस्थापकाच्या Bunch of Thoughts या पुस्तकात अनेक प्रश्न मांडले आहेत, पण सध्याच्या RSS प्रमुखांच्या अलीकडच्या विधानांकडेही दुर्लक्ष करता कामा नये.
अनेक प्रस्ताव संमत
जमियतच्या या अधिवेशनात देशाची एकता आणि अखंडता तसेच धार्मिक बंधुता मजबूत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. अधिवेशनात भारताच्या कानाकोपऱ्यातील मौलवींनी जातीयवादाच्या विरोधात आवाज उठवला. यासोबतच जमातने तरुणांना आवाहन केले की, तथाकथित संघटना इस्लामच्या नावावर जिहादचा चुकीचा अर्थ लावून दहशतवाद आणि हिंसाचाराचा प्रचार करतात. ते ना देशाच्या हिताचे आहे ना इस्लामच्या.