नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या जगाची चिंता पुन्हा वाढवली आहे. अवघ्या काही दिवसातच 50 देशांच्या आसपासाचा आकडा ओमिक्रॉनने पार केला आहे. त्यामुळे जगातील सर्वच देशांकडून काही निर्बंध लावण्यात येत आहेत. काही देशांनी तर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्याने लॉकडाऊन लावले आहे. ओमिक्रॉनचा धोका ओळखून भारतातही काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
आरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी
ऑमिक्रॉनचा धोका ओळखून भारताने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 जानेवारीपर्यंत कायम ठेवली आहे. कारण सुरूवातील दक्षिण आफ्रिकेत आढलेला ओमिक्रॉन बघता बघता भारतात पोहोचला. दक्षिण आक्रिकेतून डोंबिलित आलेला तरूणही ओमिक्रॉनबाधित निघाला. त्यामुळे राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंद घालण्याची मागणी केली होती.
15 डिसेंबर पासून उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय रद्द
आधी 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ओमिक्रॉनचा वाढता प्रसार पाहता हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. अलिकडेच समोर आलेल्या संशोधनातून काही नवी माहिती समोर आली आहे. ओमिक्रॉनचा प्रसार हा डेल्टापेक्षाही अधिक वेगाने होतो आहे. त्यामुळे केंद्र सरकारही पुन्हा अलर्ट मोडवर आले आहे. आदित्य ठाकरे यांनी कोरोना योद्ध्यांना बुस्टर डोस द्यावा, म्हणजेच तिसरा डोस लसीचा द्यावा अशीही मागणी केली आहे. आतापर्यंत ओमिक्रॉनचे 23 रुग्ण भारतात आढळून आले आहेत. ज्यात कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्लीसह 5 राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे या राज्यांच्या चिंतेत आता भर पडली आहे. देशातील अनेक विमानतळावर आरटीपीसीआर टेस्टची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना विलगीकरणातही ठेवले जात आहे. ओमिक्रॉनला रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.