मुंबई : भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत चिंताजनक बातमी आहे. कारण शेजारील कर्नाटक राज्यात कोरोना विषाणूचा (Corona Virus) नवा प्रकार असलेल्या ओमिक्रॉनची (Omicron) लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Central Home Ministry) ही माहिती दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे ओमिक्रॉनचा फैलाव कोरोनाच्या डेल्टा विषाणूपेक्षा अधिक वेगानं होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे देश आणि महाराष्टासाठी ही चिंतेची बाब आहे. महत्वाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांत ओमिक्रॉनचा फैलाव जगातील 29 देशात झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
जगातील 29 देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला असून एकूण 373 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. एका अभ्यासानुसार ओमिक्रॉन हा 5 पट जास्त संसर्गजन्य आहे. दरम्यान आरटी पीसीआर चाचणीद्वारहे हा व्हायरस ओळखला जाऊ शकतो. आम्ही जागतिक स्तरावर कोरोनाच्या प्रकरणांमधील वाढ पाहत आहोत. त्यात युरोपचा वाटा 70 टक्के आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली आहे.
दरम्यान, भारतात एकूण 99 हजार 763 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 62 आहे. महाराष्ट्रात सरपंच, आशा वर्कर्स आणि शिक्षकांच्या समितीने लसीकरण मोहीम तळागाळापर्यंत नेण्याचे चांगले काम केले असंही लव अगरवाल म्हणाले. त्याचबरोबर कोविड प्रतिबंधात्मक वर्तणूक जी आपण अनेक दिवसांपासून राबवत आहोत ती ओमिक्रॉन विरोधातही प्रभावी आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे की लस आणि कोविड प्रतिबंधात्मक वर्तन हे या विषाणूविरुद्धचे उपाय आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.
कोविड प्रतिबंधात्मक वर्तणूक जी आपण अनेक दिवसांपासून राबवत आहोत ती #OmicronVarient विरुद्धही प्रभावी आहे@WHO ने वारंवार सांगितले आहे की लस आणि कोविड प्रतिबंधात्मक वर्तन हे या विषाणूविरूद्धचे उपाय आहेत – @MoHFW_INDIA pic.twitter.com/07wtG1Ut36
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) December 2, 2021
महाराष्ट्रात आफ्रिकेतून आलेले 9 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉननं हाहाकार माजवलाय. तिथं दिवसाला कमीत कमी 4 हजार रुग्ण सापडतायत. सध्या तिथली रुग्णांची संख्या 10 हजाराच्या वर गेलेली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या बहुतांश प्रांतात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडतायत. त्यामुळेच महाराष्ट्रासह देशभरात आफ्रिकेतून आलेल्या आणि येणाऱ्यांवर प्रशासनाचा वॉच आहे. फक्त दक्षिण आफ्रिकाच नाही तर इतर आफ्रिकन देशातही ओमिक्रॉनचे रुग्ण वाढतायत. त्यात मोझंबिक, बोत्सवाना, झिम्बाब्वे अशा देशांचा समावेश आहे.
इतर बातम्या :