Omicron upadate : राजस्थानमध्ये ओमिक्रॉनचा बळी, महाराष्ट्रासाठीही धोक्याची घंटा!

| Updated on: Jan 05, 2022 | 4:25 PM

पिंपरी-चिंचवड नंतर राजस्थानमध्येही ओमिक्रॉनचा बळी गेला आहे. देशात सध्या ओमिक्रॉनच्या रूग्णांनी दोन हजारांचा टप्पा पार केला आहे.

Omicron upadate : राजस्थानमध्ये ओमिक्रॉनचा बळी, महाराष्ट्रासाठीही धोक्याची घंटा!
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

कोरोनाच्या स्फोटक आकडेवारीसोबत ओमिक्रॉनची दहशतही वाढत आहे. पिंपरी-चिंचवड नंतर राजस्थानमध्येही ओमिक्रॉनचा बळी गेला आहे. देशात सध्या ओमिक्रॉनच्या रूग्णांनी दोन हजारांचा टप्पा पार केला आहे. मुंबईवरील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस आणखी गडद होत आहे. महाराष्ट्राच्या एकूण कोरोना रुग्णांच्या आकडेवारीच्या तुलनेत एकट्या मुंबईतील कोरना रुग्णांची आकडेवारी निम्म्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा तिसर्‍या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. ओमिक्रॉन जरी वेगाने पसरत असला तरी त्याचा मृत्यूदर कमी असल्याचे आतापर्यंत निदर्शनास आले होते, मात्र राजस्थानमध्येही ओमिक्रॉनमुळे रुग्णाचा बळी गेल्याने दहशत वाढली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये काही दिवसांपूर्वीच ओमिक्रॉनमुळे मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा 28 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्या रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली होती असा अहवाल काही दिवसांपूर्वीच आला आहे. सदर व्यक्ती नायजेरियातून 12 डिसेंबरला आली होती. 17 डिसेंबरला त्यांना छातीत त्रास जाणवू लागला. म्हणून त्यास परदेशी रुग्णांसाठी राखीव असणाऱ्या भोसरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी तपासात हृदय विकाराचा सौम्य धक्का असल्याचं तपासात निष्पन्न झालं. मग पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयातील रुबी एलकेअर कार्डियाक सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. तेथे उपचार सुरू असतानाच त्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणंही जाणवू लागली. म्हणून कोरोनाची चाचणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ओमिक्रॉन चाचणीसाठी नमुने देण्यात आले. अहवाल प्रतीक्षेत असतानाच संबंधित रुग्णाची तब्येत सुधारली होती. पण 28 डिसेंबरला पुन्हा हृदय विकाराचा झटका आला आणि त्यात ती व्यक्ती मृत्यू पावली, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

राज्यात कोरोना, ओमिक्रॉनचा कहर

काल राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा तब्बल 18 हजाराच्या पुढे गेलाय. तर साडे चार हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना आकडेवारीमुळे राज्यातील कोरोनास्थिती आता चिंताजनक बणल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल 18 हजार 466 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात काल 20 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 66 हजार 308 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा आहे.

Vivo V23 : कलर चेंजिंग इफेक्ट असलेला भारतातला पहिला स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत…

Chemical fertilizer : रब्बी हंगामात दुहेरी संकट, रासायनिक खतांच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी हतबल

pimpri chinchwad crime |दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळक्यांवर पोलिसांची कारवाई ; अशी केली अटक